नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खान यांचे हत्याकांड आणि अश्लील चित्रफीत प्रकरणात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. नुकतेच नागपूर पोलिसांनी नरसिंगपूरचे पूर्वाश्रमीचे भाजपाचे आणि सध्या काँग्रेसवासी झालेले आमदार संजय शर्मा यांना नोटीस दिली आहे. ते दोन दिवसांत नागपूर पोलिसांसमोर हजर होणार आहेत. तसेच सना खान यांच्या मोबाईलची विल्हेवाट लावणारे कमलेश पटेल आणि रवीकिशन यादव ऊर्फ रब्बू चाचा या दोघांना नागपूर पोलिसांनी जबलपुरातून अटक केली.
सना खान हत्याकांडात आता नवनवीन माहिती समोर येत असून सना यांचे काही छायाचित्र आणि चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरत असल्याची चर्चा आहे. अमित हा सना खान यांचे अश्लील छायाचित्र संबंधित नेत्याला पाठवित होता. त्यानंतर सना यांना नेत्यांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठवत होता. अंतरंग क्षणाची चित्रफीत बनवत होता. त्या चित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याची धमकी देऊन २५ ते ५० लाख रुपये उकळले जात होते.
हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यातील रूग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ; १८ महिन्यांपासून मानधन थकले
हेही वाचा – बुलढाणा: बस व दुचाकीची धडक; एक ठार, दोघे गंभीर
अमितने सना यांचे तीनही मोबाईल फोन कमलेश पटेल नावाच्या मित्राला दिले होते. त्याने दोन मोबाईल नर्मदा नदीत तर एक मोबाईल विहिरीत लपवल्याची माहिती पोलिसांना दिली. धर्मेंद्र यादव याचा पिता रवीकिशन यादव याने अमितचे दोन मोबाईल लपवून ठेवले होते. त्यामुळे त्यालाही नागपूर पोलिसांनी अटक केली.