उपराजधानीतून आणखी काही बाळांची विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अंबाझरी आणि शांतीनगर पोलीस ठाण्यात बाळविक्री केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. गिट्टीखदानमधील अत्यंत आर्थिक परिस्थितीने खालावलेल्या महिलेच्या चार महिन्यांच्या बाळाला छत्तीसगडमधील एका व्यापारी दाम्पत्याला ७ लाखांत विकले तर शांतीनगरात अवघ्या पाच दिवसांच्या बाळाची विक्री करण्यात आली. याप्रकरणी अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने आयशा खान आणि सेन नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- शिकवणी वर्गात जाणारा तुमचा मुलगा सुरक्षित आहे का?

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
bsc nursing admission 1600 posts
राज्यात बीएस्सी नर्सिंगच्या १६०० जागा रिक्त, संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन

गुन्हे शाखेच्या एएचटीयू पथकाने बाळविक्रीचे राज्यातील पहिले प्रकरण शोधून काढले होते. तेव्हापासून आतापर्यंत बाळ विक्रीची ६ प्रकरणे या पथकाने उघडकीस आणली. कळमना गावात राहणाऱ्या राजू आणि राजकुमारी निषाद दाम्पत्याच्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून ५ लाखांत विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस येताच एएचटीयूने आयशा खानची पाळेमुळे शोधली. तिच्या टोळीतील तब्बल ६ जणांना अटक केल्यानंतर आयशाने केलेल्या पापाचा उलगडा करणे सुरू केले. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आयशा खान हिने गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या रिया (काल्पनिक नाव) या महिलेला जाळ्यात ओढले. रिया हिला पहिल्या पतीने सोडून दिले. तर दुसरा पती दारूडा निघाला आणि तो तिला नेहमी मारहाण करीत होता. त्यानंतर तिची एका भंगार व्यवसाय करणाऱ्या युवकाशी ओळख झाली. त्याने तिच्याशी लग्न केले. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले होती. तिसऱ्या पतीपासून तिला मुलगा झाला. परंतु, घरात अठराविश्व दारिद्र्य होते. त्यामुळे खर्च भागवणे कठीण झाले. एवढ्यात आयशा खान हिच्या टोळीची सदस्य सीमा परविन हिने तिला घेरले. तिला बाळ दत्तक देण्यासाठी तगादा लावला. सुरुवातील तिने मायेची ममता दाखवत मुलगा दत्तक देण्यास नकार दिला. परंतु, पती आणि सासूशी चर्चा केल्यानंतर बाळाच्या भविष्याचा विचार करता तिने चार महिन्यांचे बाळ दत्तक देण्याचे ठरवले.

हेही वाचा- विश्लेषण: कधी राजकीय मध्यस्थ, कधी सायबर तज्ज्ञ, कधी ‘हनिट्रॅप’… नागपुरातील महाठग अजित पारसे आहे तरी कोण?

गोकुळपेठेत आयशाला दिले बाळ

गेल्या सहा दिवसांपासून एएचटीयू पथक दोन राज्यात तपास करीत होते. शेवटी रियाच्या बाळाचा शोध लागला. बाळाला गोकुळपेठेत आयशाच्या ताब्यात देण्यात आले होते. अंबाझरी पोलिसांनी तक्रारीवरून आयशा खानसह टोळीवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहायक आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ, गजानन जांभारे, नाना ढोके, राजेंद्र अटकाळे, सुनील वाकडे यांनी सखोल तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला.

हेही वाचा- नागपूर: ‘एअर शो”पूर्वीच नागपूरकरांनी अनुभवल्या विमानांच्या चित्तथरारक कवायती

पाच दिवसांचे बाळ विक्री

राजश्री सेन नावाच्या महिलेने एका तरुणीच्या प्रसूतीचा खर्च केला. तिला स्वत:च्या घरी ठेवले. तिच्या पाच दिवसांच्या बाळाची पाच लाखांत विक्री केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एएचटीयू पथकाला तपास करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्री केलेल्या बाळाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.