आरोपींची संख्या सात
बुलढाणा : बारावीची गणित प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी साखर खेर्डा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आणखी दोन शिक्षकांच्या मुसक्या आवळल्या. हे दोघे लोणार तालुक्यातील असल्याने या फुटीचे लोणार ‘कनेक्शन’ पुन्हा सिद्ध झाले आहे. तसेच खासगी शैक्षणिक संस्थांचा गैरकारभारही अधोरेखांकित झाला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार हे शनिवारपासून साखर खेर्डा येथे तळ ठोकून आहेत. यामावार व ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी रात्रीचा दिवस करीत तपास चालविला आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास लोणार तालुक्यातून दोघा शिक्षकांना अटक करण्यात आली. दोघेही लोणार तालुक्यातील खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शेख शकील शे. मुनाफ (रा.लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणर) अशी दोघांची नावे आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ७ झाली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.