लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूरचा सागर कुंभारे आणि वर्धेतील त्याचा एक सहकारी अशा दोघांनी ‘हिमाचल’मधील लाहौल भागातील माऊंट युनाम हे २० हजार फुट उंचीचे शिखर सर करून तेथे १५ ऑगस्टला तिरंगा फडकवला. दोघेही १६ ऑगस्टच्या मध्यरात्री मनाली बेस कॅम्पमध्ये परतले. या मोहिमेत राज्यातील सहा गिर्यारोहक सहभागी झाले होते.

increase in Rabi crop sowing country farming farmers
देशातील रब्बी पेरण्यांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या, पेरा किती हेक्टरने वाढला, गव्हाचे क्षेत्र किती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
ravi rana supporter maha kumbh tour
भाविकांना महाकुंभला नेले अन् पळ काढला; रवी राणांच्या कार्यकर्त्याचा प्रताप
Chandrashekhar Bawankule , Chandrashekhar Bawankule Amravati ,
चंद्रशेखर बावनकुळे यांना सोनेरी मुकूट? चर्चेला उधाण…
Cattle Slaughter Bhandara, Cattle , Marriage ,
भंडारा : धक्कादायक! ‘दावत’साठी मंडपामागेच गोवंशाची कत्तल
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
Buldhana, Motala , dabhadi robbery, wife murder ,
बुलढाणा : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला डॉक्टर पतीने संपवले; दरोड्याचा रचला डाव, पण…

इंडियन माउंटेनरिंग फाऊंडेशन, दिल्लीद्वारे आयोजित या मोहिमेत दहा गिर्यारोहकांनी भाग घेतला. त्यात महाराष्ट्रातील ६, हरियाणा २, जम्मू-काश्मीर १, मध्य प्रदेशातील एकाचा समावेश होता. यात नागपूरचा सागर कुंभारे, वर्धेतील प्रा. प्रवीण शेळके यांच्यासह मुंबईचा प्रवीण मांजरखेडे, अमरावतीचा सुबोध वरघट, पुलगावचा निशांत सोनेकर, गडचिरोलीतील आदर्श मासटे यांचा समावेश होता.

आणखी वाचा- ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ सहा महिन्यांपासून बंद, चंद्रपूर वीज केंद्राला मोठा फटका

सागर कुंभारे व प्रा. प्रवीण शेळके हे मनाली बेस कॅम्पमध्ये १६ ऑगस्टच्या मध्यरात्री परत पोहचले. तेथून सागर ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. सागर म्हणाला, ११ ऑगस्टला मनाली येथून निघाल्यानंतर किलॉंग जिस्पा, बारालाचा भरतपूर मार्गे शिखरावर चढाई सुरू केली. सुरुवातीला भरतपूर येथे पोहोचल्यानंतर शरीरातील प्राणवायूची पातळी ५५ इतकीच दाखवत होती.

वातावरणाशी जुळवून घेत विविध उपाय केल्यावर प्राणवायूची पातळी वाढवून ८० पर्यंत नेली. संपूर्ण चमू भरतपूर ते कॅम्प १ ही कठीण खाडी चढून १७ हजार फुटांवर पोहोचली. येथेही सर्व गिर्यारोहकांची प्राणवायू पातळी तपासण्यात आली. सगळ्यांनी एक दिवस येथे घालवला. समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणावर गेल्यानंतर शरीराला त्या वातावरणाशी समरस होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यासाठी सतत पाणी पिणे, दिवसा न झोपणे, शारीरिक हालचाली आवश्यक असतात. ते चमूने केले. येथे सगळ्यांनी १५ ऑगस्टला सकाळी शिखराला गवसणी घालण्याचे ठरले. चढाईला सुरुवात करण्यापूर्वी सर्व सदस्यांना चढाईचे योग्य प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याच्या बळावर राज्यातील सहापैकी दोघे आणि इतर राज्यांतील काही सदस्य १५ ऑगस्टला पहाटे ७.४५ वाजता शिखरावर पोहचले. येथे राज्यातील दोघांनी तिरंगा फडकावला. त्यापूर्वी येथे वातावरण बिघडले होते. त्यामुळे राज्यातील चौघांनी शिखराच्या ४०० मीटरपूर्वीच माघार घेतली होती.

आणखी वाचा-विदर्भात आजपासून पावसाचे पुनरागमन; राज्याची स्थिती काय?

अडचणींचा डोंगर

चमूला शिखर चढताना वाटेत अणकुचीदार दगड व खडकांनी आच्छादलेला रस्ता लागला. त्यावर ९ तास चालताना अडचणींचाही सामना करावा लागला. या वाटेत दोन टप्प्यात बर्फही लागले. परंतु शिखरावर पोहचल्यावर तेथून चंद्रभागा व मुलकिला या रांगेतील पर्वत दिसू लागल्यावर वेगळाच आनंद झाला. शिखरावरून परतताना वातावरण अचानक बदलल्यामुळे बर्फाळ भागात सगळीकडे धुके पसरले. काही दिसत नव्हते. परंतु रस्त्याचा अंदाज घेत गाईडच्या मदतीने गिर्यारोहक परतले. अशाप्रकारे २०,०५० फुटांवरील शिखर सर करून सागर कुंभारे आणि प्रवीण शेळके यांनी विदर्भाच्या शिरपेचात मानाता तुरा रोवला.

Story img Loader