लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या चोवीस तासात उपराजधानीत दोन हत्याकांड घडले असून दोन्ही घटनांमध्ये प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधाची किनार आहे. श्रेयांश शैलेश पाटील (२१, रा. श्रावस्तीनगर) असे जरीपटक्यातील हत्याकांतील मृत युवकाचे नाव आहे तर निखिल शाहू उके (२१), प्लॉट नं. ८५, अजनी असे अजनीतील हत्याकांडातील आरोपींची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून नागपूर पोलीस आणि गुन्हे शाखा पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला आहे. त्यामुळे खून, खुनाचा प्रयत्न आणि अन्य गुन्ह्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. भरदुपारी हत्याकांड घडत असल्यामुळे पोलिसांच्या गस्तप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. जरीपटक्यातील हत्याकांडात श्रेयांश जरीपटक्यातील एका दुकानात काम करीत होता.

आणखी वाचा-भंडारा: अत्याचार, खून प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या नराधमाने कारागृहातून सुटका होताच पुन्हा…

परिसरात राहणाऱ्या मयूरी (काल्पनिक नाव) हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते. मयूरी ही अल्पवयीन असून तिलाही श्रेयांश आवडत होता. दोघेही नेहमीच एकमेकांशी समाज माध्यमांवरून संपर्क साधायचे. दुसरीकडे आरोपी अमित मेश्राम (१८) याचेही मयूरीसोबत प्रेमसंबंध होते. मयूरीला दोघांशीही बोलायची आणि प्रेम असल्याचे दर्शवायची. अमित आणि श्रेयांश दोघेही मयूरीवर प्रेम असल्याचा दावा करायचे. अमित म्हणायचा तू मयूरीसोबत बोलू नको आणि प्रेमसंबंध संपव. तर श्रेयांशही त्याला तिच्यापासून दूर राहण्यास सांगत होता. यावरून ते एकमेकांचे विरोधक झाले होते. मयूरी कुणाची प्रेयसी होणार, याबाबत गुरुवारी भेटून ते ठरणार होते.

श्रेयांशने आरोपी अमितला दुपारी १२ भेटण्यासाठी बोलावले. घराजवळच भेटणार होते. वेळेनुसार अमित आपल्या अल्पवयीन सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचला. चर्चेदरम्यान अमित आणि श्रेयांश यांच्यात वाद उफाळला. तयारीने आलेला अमित व त्याच्या अल्पवयीन सहकाऱ्यांनी श्रेयांशवर रॉड आणि चाकूने हल्ला केला. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर आरोपी घटनास्थळाहून पसार झाले. हा थरार भर वस्तीत झाला.

आणखी वाचा- नागपूर : अल्पवयीन पत्नीला माहेरी सोडून पतीचे पलायन

माहिती मिळताच जवळपासचे लोक धावले. श्रेयांशच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जरीपटका पोलीस पोहोचले आणि घटनास्थळी पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला.

अजनी पोलिसांचा वचक नाही

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या पाच दिवसांत दोन हत्याकांड घडले. निखिल शाहू उके या युवकाचा बहिणीशी प्रेमसंबंध असल्यामुळे तिघांनी चाकूने भोसकून खून केला. तर गेल्या २४ जूनला जानकीप्रसाद चौधरी (७०), रामेश्वरी अजनी यांचा रमेश वर्मा आणि सुमित वर्मा या बापलेकांनी दगडाने डोके ठेचून खून केला. दोन्ही हत्याकांडामुळे अजनीत दहशत निर्माण झाली असून पोलिसांचा वचक कमी झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two murders in twenty four hours in nagpur adk 83 mrj
Show comments