लोकसत्ता टीम

गडचिरोली : तब्बल ३२ वर्ष नक्षलवादी चळवळीत कार्यरत असलेल्या नरसिंग या जहाल नक्षलवाद्यासह दोघांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळीला पुन्हा एकदा हादरा बसला आहे.

News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
Jitendra Awhad gave friendly advice to Minister pratap sarnaik
जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला
Gulabrao Patil insta
जळगावचं पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांकडेच? घोषणेआधीच मोठं वक्तव्य; विरोधकांना दमबाजी करत म्हणाले…
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Torres
Torres Scam : टोरेस फसवणूकप्रकरणी आरोप असलेले सीए अभिषेक गुप्तांची न्यायालयात धाव; वकील म्हणाले, “युक्रेनिअन माफिया…”
Gadchiroli, Surrender women Naxalites, Naxalites,
गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तब्बल ५३ गुन्ह्यांची…

एरिया कमिटी मेंबर रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग ( ५५, रा. गट्टानेली, ता. धानोरा) व दलम सदस्य रमेश शामू कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (२५ , रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) अशी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नावे असून दोघांवर एकूण आठ लाखांचे बक्षीस होते. मागील काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधात पोलीस दलाकडून आक्रमक धोरण रबविण्यात येत आहे. सोबतच प्रशासनाकडून आत्मसमर्पितांसाठी विविध योजना देखील सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पणाकडे कल वाढलेला आहे.

आणखी वाचा-‘भारत जोडोत’ सक्रिय शहरी नक्षल संघटनांची नावे द्या, मुख्यमंत्र्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पत्र

दरम्यान, २० डिसेंबरला १९९२ पासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेला जहाल नक्षलवादी नरसिंग आणि रमेश कुंजाम या दोघांनी गडचिरोली पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. दोघांवरही खून, जाळपोळ, चकमक प्रकरणी डझनभर गुन्हे दाखल आहेत. यातील रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग हा १९९२ पासून नक्षलवादी चळवळीत आहे. १९९२ मध्ये तो टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला.१९९५ मध्ये काकुर दलममध्ये राहुन सन १९९६ पर्यंत नक्षलवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम तो करीत होता.

पुन्हा तो टिपागड दलमसाठी काम करु लागला. पुढे माड एरिया (छत्तीसगड) येथे बदली होऊन २००१ पर्यंत त्याने पुरवठा टीममध्ये काम केले. २०१० पासून तो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १२ गुन्हे नोंद असून ६ चकमक, ५ खून, १ दरोडा प्रकरणात त्याचा सहभाग राहिलेला आहे. रमेश शामू कुंजाम हा २०१९ पासून माओवादी चळवळीत आहे. चेतना नाट्यमंच ,कुतुल दलममध्ये सदस्य म्हणून तो काम करत होता. त्याच्या गुन्हेकृत्याची पडताळणी सुरु आहे.

आणखी वाचा-विधानसभा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र, जयभीम घोषणा अन्…

नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा , पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ ३७ बटालीयनचे प्रभारी समादेशक सुजीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण झाले.

वर्षभरात २० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

चालू वर्षात आतापर्यंत २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. २०२२ पासून आतापर्यंत आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या ३३ झाली आहे. माओवाद्यांनी गुन्हे चळवळ सोडून आत्मसमर्पण करुन लोकशाही मार्ग स्वीकारावा , असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

Story img Loader