लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अखत्यारित असलेल्या नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या एका एमएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्याचा परिसराच्या बाहेर असताना अपघाती तर दुसऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या गावात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती आहे.

आणखी वाचा-कुख्यात डॉन अरुण गवळी पुन्हा एकदा कारागृहाबाहेर, गवळीला मिळाली संचित रजा

‘मेडिकल’मध्ये एमएस्सी नर्सिंग अंतिम वर्षाला शिकणारा विद्यार्थी सचिन कांबळे मेडिकलच्या बाहेर काही खासगी कामानिमित्त गेला असता अपघातात जखमी झाला. येथील ट्रॉमा युनिटमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर येथे शिकणारी एक विद्यार्थिनी काही कामासाठी तिच्या वर्धेतील घरी गेली होती. तिनेही आत्महत्या केल्याची माहिती आहे. एकाच वेळी मेडिकलचे दोन विद्यार्थी दगावल्याने विद्यार्थ्यांसह नर्सिंगच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीही मेडिकलमधील एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा गॅस्ट्रोइंट्रोसीसमुळे मृत्यू झाला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two nursing students died in nagpur mnb 82 mrj