नागपूर : अंबाझरीतील बॅरेल पबमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन विभाग उपाध्यक्षाला जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संतप्त मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अंबाझरी पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. अभिषेक डे आणि मोहित देसाई अशी जखमी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

हेही वाचा – सात सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार, ‘या’ राज्यातही कोसळणार पाऊस

अभिषेक आणि मोहित हे मनसेचे शहर उपाध्यक्ष आहेत. ते रविवारी अंबाझरीतील बॅरेल पबमध्ये गेले होते. तेथे दोघांचाही दोन युवकांशी वाद झाला. त्यामुळे पबमधील बाऊंसरने अभिषेक आणि मोहित यांना बाहेर काढले. व्यवस्थापकाने पालिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ शेरेकर यांनी अभिषेक आणि मोहितला पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी मनसचे पदाधिकारी असल्याचे पोलिसांना सांगताच पोलिसांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अभिषेकच्या नातेवाईकांनी पहाटेच्या सुमारास २० हजार रुपये आणून दिल्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आले. सकाळी मनसेचे शहराध्यक्ष चंदूभाऊ लाड यांना माहिती देण्यात आली. त्यांनी काही कार्यकर्त्यांसह अंबाझरी पोलीस ठाणे गाठले. ठाण्याला घेराव घालण्यात आला. त्यानंतर पक्षाच्यावतीने अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

हेही वाचा – ‘‘डाळभाजी, पोळी, भात आणि ठेचा हा राष्ट्रीय मेन्यू आहे का?” कोणी उपस्थित केला प्रश्न, वाचा सविस्तर…

अभिषेक डे आणि मोहित देसाई यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा व सुटकेसाठी २० हजार रुपये पोलिसांनी घेतल्याचाही आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, असा कोणताही प्रकार पोलिसांनी केला नाही. – विनायक गोल्हे, ठाणेदार, अंबाझरी पोलीस ठाणे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two office bearers of mns were beaten up by the police in nagpur ssb adk 83 ssb
Show comments