नागपूर : खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात (स्टॅकर रिक्लेमर मशीन) अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. महानिर्मितीने तीन सदस्यीय समितीकडून या अपघाताची चौकशी सुरू केली. दरम्यान, या प्रकरणात उपमुख्य अभियंता अरुण पेटकर, कार्यकारी अभियंता संदीप देवगडे प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : Maharashtra Political Crisis Live Updates : विधिमंडळ कामकाजाच्या महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर

हेही वाचा : गडचिरोली : लहानशा गावात सापडले लाखोंचे घबाड; नक्षल संबंधांची शक्यता!

खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात १८ ऑगस्टला पहाटे हा अपघात झाला होता. दरम्यान या विभागात अशाप्रकारचा अपघात होऊ शकतो, अशी तक्रार ६ ऑगस्टला कार्यकारी अभियंता (संचालन) यांच्याकडे केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच ही घटना घडली, असा आरोप अपघातानंतर काही कामगार संघटनांनी केला होता व याबाबत पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यानंतर महानिर्मितीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली. त्यात कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता प्रफुल्ल कुटेमाटे, कोराडीतील अधीक्षक अभियंता कमलेश मुनेश्वर, मुंबईचे कार्यकारी अभियंता जितेंद्र खंडाळे यांचा समावेश होता. समितीच्या चौकशीत प्राथमिकदृष्ट्या उपमुख्य अभियंता अरुण पेटकर व कार्यकारी अभियंता संदीप देवगडे हे दोन अधिकारी दोषी आढळल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या वृत्ताला महानिर्मितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

Story img Loader