वर्धा : बदललेल्या नियमावलीनुसार दत्तक विधानाचा पहिला आदेश दोन अनाथ बालकांना थेट विदेशी नागरिकत्व बहाल करणारा ठरला आहे. यापैकी एक स्वीडिश पालकांच्या छत्रछायेत तर दुसरे बालक अमेरिकेत जाणार आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दत्तक विधान प्रक्रिया सुरू झाली आहे. न्यायालयासमोरील अशी सर्व प्रकरणे नवीन नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित झाली. अशी दहा प्रकरणे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> फळ्यावर लिहा, नंतर खाऊन घ्या!, चिमुकल्या संशोधकाने तयार केला पौष्टिक खडू

महिला व बाल विकास कार्यालयाच्या अधिनस्थ दोन विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांनी बालकांचे प्रस्ताव कायदेशीर पूर्तता करीत तयार केले. त्यातील एका प्रस्तावास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीडनच्या पालकांना हा आदेश सुपूर्द करण्यात आला. नववर्षाच्या प्रारंभीच या अनाथ बालकास हक्काचे घर व पालक मिळाले आहे. जिल्ह्यात सहा देशांतर्गत व दोन देशाबाहेर, असे दत्तक विधानाचे आठ आदेश मंजूर करण्यात आले आहे. अमेरिकेतील पालकांनी दत्तक घेतलेले बालक लवकरच नव्या घरात विसावणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two orphaned children got a love swidish and america parents pmd 64 ysh
Show comments