नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी राज्यभरासह देश-विदेशातील पर्यटक येतात. पण, व्याघ्रदर्शन होत नसल्यामुळे निराश होऊन तशा नोंदी करून परततात. त्यामुळे येथील पर्यटक संख्या लक्षणीयरित्या रोडावली आहे. ही तक्रार लक्षात घेता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला वाघ-वाघिणीचे दोन जोडपी देणार व पुढे त्यांची पिलावळ होईल आणि त्यातून त्यांची संख्या वाढेल, यासाठी सोय करणार असल्याचे सूतोवाच वनमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- भूकंपाचा नागपूरला धोका नाही पण….. सौम्य धक्के

तिरोडा येथे आ. विजय रहांगडाले यांच्या तर्फे आयोजित ११ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन, महाआरोग्य शिबीर व नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री मुनगंटीवार उपस्थित होते. या कार्यक्रमात खा. सुनील मेंढे यांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित तक्रारी मांडल्या. यासंदर्भात मुंबई येथे बैठक घेऊन तातडीने प्रयत्न करणार असल्याची हमी मुनगंटीवार यांनी दिली. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात लवकरच वाघ-वाघिणीचे दोन जोडपी आणण्याबाबत त्यांनी सुतोवाच केले.