नागपूर : नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना ‘एचएमपीव्ही’ असल्याचे खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे येत आहे. परंतु नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत या रुग्णांची पुन्हा तपासणी करूनच या रुग्णाच्या नेमक्या आजाराची माहिती कळू शकणार असल्याचे सांगत आहे.

नागपुरातील मेडिट्रिना या खासगी रुग्णालयात सदर रुग्णांवर उपचार सुरू होते. येथील दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याच खाजगी रुग्णलायांतून सांगितले जात आहे. एका सात वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीचा रिपोर्ट ३ जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती. खाजगी प्रयोगशाळेत या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्हीज आला असला तरी सदर रुग्णांची पुन्हा एकदा तपासणी एम्समधील आयसीएमआर द्वारा संचालित प्रयोगशाळेत केली जाईल. त्यानंतर शासकीय प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेन्सीमग केली जाईल. त्यानंतरच हे रुग्न एचएमपीव्हीचे अथवा इतर हे स्पष्ट होईल.

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?

हेही वाचा…ऑनलाइन रेल्वे तिकीट खरेदीची सुविधा नसल्याने अडचणी; अपंग प्रवाशांची रांगेत परवड

‘मेटान्यूमोव्हायरस’साठी मेडिकल, मेयो रुग्णालय सज्ज !

चीनमध्ये उद्रेक घालणाऱ्या मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) सामना करण्यासाठी नागपुरातील मेडिकल आणि मेयो ही दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सज्ज आहे. दोन्ही रुग्णालयांत लवकरच एक नोडल अधिकारी ठरणार असून उपचाराच्या व्यवस्थापनासाठी समितीची निश्चित होणार आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याचे आयुक्त राजीव निवतकर यांनी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांची बैठक घेतली. यावेळी तातडीने सगळ्याच महाविद्यालय स्तरावर या आजाराबाबत नोडल अधिकारी नियुक्त करणे, उपचाराच्या व्यवस्थापनाबाबत समिती नियुक्त करणे, या विषाणूच्या लक्षणासह इतरही महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा झाली. याबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षण खात्याकडून सूचना निर्गमित करणार असल्याचे सोमवारच्या बैठकीत निवतकर यांनी सगळ्याच महाविद्यालयांना सांगितले. दरम्यान मेडिकल-मेयोच्या औषधशास्त्र विभाग, श्वसनरोग विभागातील अधिकाऱ्यांकडून या आजारावर मंथन सुरू झाले असून रुग्ण आढळल्यास प्राथमिक स्तरावर काय करावे? हेही लवकरच निश्चित होईल. या आजारात करोना सदृश्य सौम्य लक्षणे राहत असून मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयात रुग्ण आल्यास सहज उपचार शक्य असल्याची माहिती मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

हेही वाचा…नागपूर : खगोलप्रेमींसाठी विशेष पर्वणी! सात ग्रह एकाच वेळेला बघता येणार….

मेडिकलमध्ये पाच ‘बेड’ सज्ज

नागपुरातील मेडिकल रुग्णालयात नवीन विषाणूजन्य आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर उपचारासाठी पाच ‘बेड’ आरक्षित आहेत, असे एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले. तर मेयोतही नागपुरात रुग्ण आढळताच झटपट रुग्णशय्या उपलब्ध करणार असल्याचे तेथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Story img Loader