अकोला जिल्ह्यात करोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आज एक करोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. सोमवारी खासगी रुग्णालयातील दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात आपोती खु. येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या रुग्णास २३ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. याशिवाय, शहरातील रामनगर येथील ९१ वर्षीय महिलेला १२ जुलै रोजी खासगी रुग्णालात दाखल करण्यात आले होते. या दोन्ही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून करोना संसर्ग तपासणीचे नऊ अहवाल प्राप्त झाले.

त्यात शहरातील एका महिला रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला, तर चार रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या ६५ हजार ६९१ आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८३ सक्रिय करोनाबाधित रुग्ण आहेत.

Story img Loader