अमरावती: गावठी दारू पिल्याने विषबाधा होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मोर्शी तालुक्यातील तरोडा येथे बुधवारी घडली. या घटनेत चार जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जंगलू टेकाम (६२) आणि मयाराम धुर्वे (६७, दोघेही रा. तरोडा) अशी मृतांची नावे आहेत. तर सीताराम शेषराव परतेती (३७), सुंदा मयाराम धुर्वे (६५), सिंधू इसम धुर्वे (४५) आणि सुमेलाल श्यामू कुमरे (४०) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
हेही वाचा… राजूर घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना ३१ जुलै पर्यंत ‘एमसीआर’
याबाबत पोलीस आणि ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की, मयाराम धुर्वे याने गावठी दारू आणली. बुधवारी सायंकाळी गावातील सहा जण मद्यप्राशन करण्यासाठी जमले होते. गावठी दारू पित असतानाचा काही जणांना अस्वस्थ वाटू लागले, उलट्या होऊ लागल्या, तरीही चंद्रकला टेकाम या महिलेने इतर लोकांना दारू पिण्यास दिली. दारू पिणाऱ्या लोकांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान जंगलू टेकाम आणि मयाराम धुर्वे या दोघांचा मृत्यू झाला. अन्य चौघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.
हेही वाचा… १० हजारांची लाच स्वीकारतांना सरपंच अडकला
या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी गावठी दारू आणणाऱ्या मयाराम धुर्वे आणि दारू पिण्यास देणाऱ्या चंद्रकला टेकाम यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चंद्रकला टेकाम हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तरोडा हे गाव मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे. मध्यप्रदेशातून गावठी दारू ही सीमेवरील खेड्यांमध्ये आणली जात असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून निदर्शनास येते. तसेच सीमेलगतच्या गावांमधून रोजगारासाठी मजूर लोकांची ये-जा सुरू असते. मध्यप्रदेश सीमेवरील एखाद्या खेड्यातून ही गावठी दारू पिण्यासाठी आणली गेली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी घटनास्थळी भेट दिली असून घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे हे करीत आहेत.