गोंदिया : गोंदिया येथील कॅरिअर झोन एज्युकेशनल इंस्टिटयूटमधील चार विद्यार्थी रेल्वेच्या पुलाखाली पांगोली नदी येथे आंघोळीसाठी गेले असता चारपैकी एक विद्यार्थी यशराज धिरेंद्रसिंग रघुवंशी (वय १७, रा. अवंती चौक गोंदिया) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यासंदर्भातील माहिती पोलीस कंट्रोल रूम येथून प्राप्त झाली असता गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे शोध व बचाव पथक घटनास्थळी पाठविण्यात आले असून शोध कार्य सुरू आहे.

हेही वाचा – बुलढाणा : ढाब्याऐवजी पत्रकार उतरले रस्त्यावर! बावनकुळेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mumbai child death water tank
मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू
Mahabaleshwar Suicide , person jump into valley Mahabaleshwar ,
महाबळेश्वरमध्ये दरीत उडी मारून आत्महत्या
child found dead in water tank in Bhiwandi
पाण्याच्या टाकीत पाच वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला
14-year-old schoolgirl dies after being hit by speeding bike
भरधाव दुचाकीच्या धडकेत १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू
boy died Mumbai, water tank, boy died drowning,
मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू
police sub inspector suicide
विरारमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

हेही वाचा – ‘तिजोरी’ भरण्यासाठी वाट्टेल ते? कोतवाल व्हायचे तर पाचशे रुपये शुल्क, अर्जही फुकट नाही

दुसऱ्या घटनेत देवरी तालुक्यात प्रख्यात असलेल्या धुकेश्वरी मंदिर परिसरात असलेल्या पवन तलावात एका तरुणाने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तलावात उडी घेवून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सागर राजनकर वय २६ वर्षे रा. देवरी असे असून देवरी पोलिसांनी मंगळवारी सकाळी तलावात शोध मोहीम राबवून या बुडालेल्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. सागरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.

Story img Loader