नागपूर : वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार वडिलोपार्जित शेतीच्या सातबारावर फेरफार नोंद करून नाव समाविष्ट करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला तलाठ्यासह कोतवालाला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी मौदा तालुक्यातील चाचेर तलाठी कार्यालयात केली. आरोपी सुनीता नेमीचंद घाटे (५४, रा. संमती भवन, जैन मंदिराजवळ, इतवारी, नागपूर) असे लाचखोर तलाठी तर किशोर किसन वानखेडे (५४, वार्ड क्रमांक ४, चाचेर) असे आरोपी कोतवालाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘पार्टटाईम जॉब’च्या नादात ३ लाख गमावले

हेही वाचा – चंद्रपूर : लॉयड मेटल्सकडून परवानगीविना वसाहतीचे बांधकाम, म्हातारदेवी ग्रामस्थ संतप्त

चाचेर येथील एका शेतकऱ्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार वडिलोपार्जित शेतीचे सातबारावर फेरफार नोंद करून नाव समाविष्ट करायचे होते. ते मौदा तालुक्यातील चाचेर तलाठी कार्यालयात गेले. तेथे तलाठी सुनीता घाटे यांनी ३ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती दोन हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. ती लाच कोतवाल किशोर वानखडे याच्याकडे देण्याचे ठरले. शेतकऱ्याने एसीबीचे अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर अधीक्षक संजय पुरंदरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार, बुधवारी दुपारी सापळा रचण्यात आला. दोन हजार रुपयांची लाच कोतवालाने घेऊन तलाठी सुनीत घाटे हिच्याकडे दिली. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people including a female talathi arrested while taking bribe anti corruption department took action at chacher talathi office in mauda taluka adk 83 ssb