वर्धा : १३ ऑक्टोबर रोजी आर्वी तालुक्यात घडलेल्या बलात्कार प्रकरणी आरोपी शुभम प्रकाश पाणबुडे व अशपाक अकबर शहा या दोघांना पुणे जिल्ह्यातील कारेगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – डॉ. मोहन भागवत म्हणतात सरकारकडे समस्या मांडेल, परंतु ते ऐकतील का हे माहीत नाही
पीडित मुलगी ही रोहणा येथील महाविद्यालयात शिकते. घटनेच्या दिवशी ती घराकडे परत निघाली असताना आरोपींनी तिला धमकावत गाडीत बसविले. धानोडी धरणाजवळ थांबवून तिला जबरीने दारू पाजली. त्यानंतर आळीपाळीने अत्याचार केला. त्या दिवशीपासून आरोपी फरार होते. चारचाकीने पळून गेलेल्या या आरोपींचा लगतच्या जिल्ह्यात शोध सुरू झाला. पुढे ते कंपनीच्या कामासाठी कारेगाव परिसरात गेल्याची माहिती पुढे आली. त्यांना तेथूनच पकडण्यात आले. आर्वी पोलीसांनी त्यांची विचारपूस केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
First published on: 19-10-2023 at 10:22 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two persons arrested from pune in the case of rape in arvi taluka pmd 64 ssb