लोकसत्ता टीम
गोंदिया: आमगांव पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी मारहाण केली असल्याची घटना रविवारी घडली होती. या प्रकरणातील एक पोलीस प्रवीण मेगरे याला गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी निलंबित केले आहे.
आमगांव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस रात्र पाळीतील कर्तव्यावर असताना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या (मुरुम) भरलेले ट्रॉली पळून जात असताना त्यांना थांबवून मुरूम वाहतुकीचा परवाना मागितला असता आरोपींनी ते पोलीस असल्याचे माहीत असून ही आमगांव पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना दोरीने बांधून काठीने मारहाण केली व त्यांचा मोबाईल हिसकवला.
हेही वाचा… विद्यार्थ्यांना दिलासा! दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
ही घटना रविवार रात्री घडली होती. या प्रकरणी पाच आरोपींना आमगांव पोलिसांनी केली अटक होती. या प्रकरणाचा पुढील तपास आमगांवचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात शुरू होता. त्या तपासादरम्यान मारहाण करणाऱ्या आरोपीसोबत घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता पोलीस हवालदार विजय चुनीलाल कोसमे यांना आरोपी मारहाण करित असताना पोलीस शिपाई प्रवीण मेगरे यांनी भीतीपोटी घटनास्थळ येथून पळ काढला होता. त्यांच्यावर कर्तव्यावर असताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्याला निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा… बुलढाणा : लोंबकळणाऱ्या तारा ठरल्या प्राणघातक; मशागत करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
घटनास्थळी असताना यांनी आरोपींचा प्रतिकार केला असता तर ही मारहाणीची घटना कदाचित टाळता आली असती, या पोलीस हवालदार मारहाण प्रकरणामुळे विभागाची बदनामी झाली असा पोलीस विभागाचा निष्कर्ष आहे. पोलीस शिपाई प्रवीण मेगरे याला निलंबित करण्यात आल्याचे पत्र आमगांव पोलीस स्टेशन ला पाठवून कळविण्यात आले आहे तसेच या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस याची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी दिली.