वर्धा : एका युवतीस फरफटत नेण्याच्या घटनेत दुर्लक्ष केल्याबद्दल रामनगर पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन हे म्हणाले की कनिष्ठ पातळीवर ही विचारणा झाली असून पोलीस अधीक्षक कार्यालय पातळीवर नंतर दखल घेतल्या जाणार आहे.

२६ सप्टेंबरची ही घटना आहे. रात्री साडेसात वाजता श्रद्धा सुनील झोटिंग ही मैत्रीण साक्षी लोखंडेसह आर्वी मार्गाने पायी चालली होती. त्याचवेळी एमएच ३२ सी ७२२५ या क्रमांकाच्या कारने या दोघीस धडक दिली. त्यात श्रद्धा ही १०० मिटर अंतरावर फरफाटत गेली. ते पाहून नागरिकांनी एकच ओरड केली. त्यामुळे कारचालक थांबला. पण घटना पाहून चालक व सोबत असलेले दोघेही पळून गेली. शेवटी काहींनी श्रद्धास बाहेर काढून लगेच सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. या घटनेची चांगलीच चर्चा झाली. मात्र आरोपीस अटक किंवा कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून आल्यावर संताप व्यक्त होवू लागला. रामनगर पोलिसांवार आरोप होत गेले. शेवटी घटनेस सहा दिवस उलटल्यावर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच शुक्रवारी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा अन्य गुन्हा दाखल केला.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
nitin gadakari in Ichalkaranji
इंदिरा गांधी यांच्याकडूनच घटनेची सर्वाधिक मोडतोड ; नितीन गडकरी
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल

हे ही वाचा…गाजियाबादचे पडसाद थेट अमरावतीत…जमाव पोलीस ठाण्यात धडकला आणि दगडफेक….

या तपासात जखमी मुलीचे बयान घेण्यात आले नव्हते. तसेच परिसरातील सिसिटीव्ही फुटेज पाहल्या गेले नाही. घटनेनंतर कारमधील दोन युवकांना ठाण्यात बोलावून सोडून देण्यात आल्याची बाब संताप निर्माण करणारी ठरली. त्याचा जाब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारल्यावर मग कारवाई सूरू झाली. ही घटना ठाण्यात प्रभारी अधिकारी कार्यरत होते. आता दोन दिवसापूर्वी ठाणेदार नेहते हजर झाल्यानंतर त्यांनी एका आरोपीस अटक केली. त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समीर खान आश्रफ खान असे या आरोपीचे नाव असून तो बोरगाव येथील झाकीर हुसेन कॉलनीत राहतो. अन्य दोन फरार आहेत.

हे ही वाचा…राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका

तपासात दिरंगाई केल्याबद्दल रामनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व ग्रेड पोलीस निरीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यात दोषींना सोडल्या जाणार नाही अशी हमी वरिष्ठ देतात. पंचनाम्यात त्रुटी, घटनास्थळी पडलेले जखमी युवतीचे बूट, आरोपीचा शोध असे व अन्य पैलू कारणे दाखवा नोटीस मागे असल्याचे समजते.