लोकसत्ता टीम
नागपूर : विदर्भात दोन वैज्ञानिकांची संशोधनाच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारासाठी निवड झाली आहे. वैज्ञानिकांच्या क्षेत्रात भारतीय नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रसायनशास्त्राचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांना जाहीर झाला आहे. तर अकोला जिल्ह्यातील सुपुत्र प्रो. महेश काकडे यांना गणित आणि संगणक विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ ऑगस्टला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते या वैज्ञानिकांचा गौरव करण्यात येणार आहे.
पोलशेट्टीवार हे यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन या छोट्याशा गावातील मुळ रहिवासी आहेत.सध्या ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्रोफेसर आहेत. तर महेश काकडे हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे कार्यरत आहेत. पोलशेट्टीवार यांना हवेतील कार्बनचे घटक वेगळे करून त्याचे उपयोगी घटकात रुपांतर करण्याबाबत संशोधन केले आहे. प्रदुषण मुक्तीच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
आणखी वाचा-Bachchu Kadu: “मोर्चा अडवू नका, अन्यथा…”, बच्चू कडू यांचा इशारा
पोलशेट्टीवार यांचे प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण केले. उच्च शिक्षण अमरावती विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर ते अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले होते. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ या विषयावर ते संशोधन करीत असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत.
प्रा. महेश काकडे याना दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. गणित विभागातील प्राध्यापक असलेले काकडे यांना त्यांच्या संशोधनासाठी हे पुरस्कार मिळाले आहेत.लंडन मॅथ सोसायटीचा व्हाईटेड पुरस्कार काकडे यांना त्यांच्या ईवासावा सिध्दांत आणि झीटा व एल व्हॅल्यूच्या प्रगतीसाठी उत्कृष्ट योगदानाबद्दल मिळाला आहे.
आणखी वाचा-दत्ता मेंघेंचे पुतणे काँग्रेसमध्ये दाखल; भाजपातील बड्या कुटुंबास खिंडार…
विज्ञान युवा पुरस्कार विजेत्यांमध्ये कृषी विषयात कृष्णमूर्ती एसएल आणि स्वरूप कुमार परिदा, जैविक विज्ञानात राधाकृष्णन महालक्ष्मी आणि अरविंद पेनमत्सा, रसायनशास्त्रात विवेक पोलशेट्टीवार आणि विशाल राय, पृथ्वी विज्ञानात रॉक्सी मॅथ्यू कोल, अभिलाष आणि राधा कृष्णा गंती, अभियांत्रिकी सायन्समध्ये पी. आणि पर्यावरण शास्त्रात बप्पी पॉल, गणित आणि संगणक शास्त्रात महेश रमेश काकडे, जितेंद्र कुमार साहू आणि प्रज्ञा ध्रुव यादव वैद्यकशास्त्रात, उर्बसी सिन्हा भौतिकशास्त्रात, दिगेंद्रनाथ स्वेन आणि प्रशांत कुमार यांनी अंतराळ विज्ञानात, आणि प्रभू राजगोपाल यांचा समावेश आहे.
© The Indian Express (P) Ltd