आज, सोमवारची संध्याकाळ संतनगरी शेगाव आणि पोलीस दलाला हादरवणारी ठरली! येथील एका बंगल्यातून दोघा सराईत दरोडेखोरांनी किमान एक कोटीचा मुद्देमाल लंपास केला. वृत्तलिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार या धाडसी दरोड्याचा आकडा एक कोटीपेक्षा अधिक असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. घटनेचा सविस्तर तपशील कळू शकला नाही.
हेही वाचा >>> बुलढाणा : अपघातांची ‘समृद्धी’! शिवणा पिसानजीक भीषण अपघातात तीन ठार; मृतक नागपूरचे असल्याची माहिती
प्राथमिक माहितीनुसार, शेगाव शहरातील बसस्थानक परिसरातील मटकरी गल्ली येथील रहिवासी आनंद पारडीवाल हे बाहेरगावी गेले होते. दरोडेखोरांनी हीच संधी साधत सोमवारी संध्याकाळी उशिरा बंगल्यामधील दागिने आणि रोख रक्कम, असा जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून घटनास्थळी श्वानपथक दाखल झाले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. दरोडेखोरांनी एक कोटीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख लंपास केल्याचा अंदाज आहे.