जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामाकामासाठी साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदाराकडून ४१ हजारांची लाच घेणाऱ्या दोन सरपंचासह एका उपसरपंचास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. चिमूर तालुक्यातील बोरगाव (बुट्टी) चे सरपंच रामदास चौधरी (३९), उपसरपंच हरीश गायकवाड (४५) व आंबेनेरीचे सरपंच संदीप दोडके असे लाच घेणाऱ्या सरपंच व उपसरपंचाची नावे आहेत.

हेही वाचा >>> वाघाने जिल्हा सोडला पण डरकाळ्या सुरूच; शाळा ओस तर वन कर्मचारी त्रस्त

50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई

चिमूर तालुक्यातील आंबेरी ग्राम पंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अन्य बांधकामाकरीता उमरेड येथील तक्रारदार ठेकेदाराला साहित्य पुरविण्याचे काम मिळाले होते. तक्रारदाराने शाळेच्या बांधकामाला लागणारे सर्व साहित्य पुरविले. पुरविलेल्या साहित्याचे धनादेश मागणी केली असता, आंबेनेरीचे सरपंच संदीप दोडके यांनी ५ टक्के कमिशननुसार ७८,६०० रूपये लाचेची मागणी केली होती.

हेही वाचा >>> शंकरबाबा पापळकरांच्या मानस कन्येचे ‘एमपीएससी’त यश…कचरा पेटित सापडलेल्या मुलीचा…

 तडजोडीअंती ४१ हजार रूपये देण्याचे ठरले. मंगळवारी संदीप दोडके यांना ४१ हजार रूपये घेताना सरपंच संदीप दोडके यांना लाचलुचपत विभागाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या सोबत असलेले बोरगाव बुटीचे सरपंच रामदास चौधरी, उपसरपंच हरीश गायकवाड यांचाही त्यामध्ये सहभाग असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. चिमूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.