बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याने हादरलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील दोन बारावीच्या परीक्षार्थीना आज निलंबित करण्यात आले.
आज ३ मार्च रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील चारपैकी एका परीक्षा केंद्रावर बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्यापूर्वीच फुटला. याची गंभीर दखल घेत सिंदखेडराजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी चार केंद्रांवरील ‘बंदोबस्त’ वाढवला. गावडे यांनी सर्व परीक्षा केंद्रांवर भेटी दिल्या.
हेही वाचा- अमरावती शहरात १२ लाखांचे ‘एमडी’ जप्त
दरम्यान, साखरखेर्डा येथील एसईएस कनिष्ठ महाविद्यालयात तपासणी करण्यात आली. यावेळी भरारी पथकातील देऊळगाव राजाचे तहसीलदार श्याम धनमने यांनी बारावीच्या गणिताच्या पेपरात गैरप्रकार करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.