चंद्रपूर: वाघांच्या तीन बछड्यांची आई वाघीण बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपविभागातून अचानक बेपत्ता झाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, वाघिणीच्या शोधासाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे. तर वन पथक जंगलात शोध घेत आहे. वाघिणीच्या गंभीर बछड्याची प्रकृती नाजूक आहे.

गुरुवार ७ सप्टेंबर रोजी आई वाघीणपासून दुरावल्याने भुकेने व्याकूळ झालेल्या दोन बछड्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपविभागात उघडकीस आली. या घटनेमुळे वन खात्यात खळबळ उडाली आहे. तिसऱ्याही बछड्याची प्रकृती गंभीर असून वनविभागाकडून बछड्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान वाघीण बेपत्ता असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. वन विभागाने नुकतीच सावली वन विभाग तथा गडचिरोली जिल्ह्यात एकूण चार वाघांच्या शिकारी टोळीला अटक केली आहे. त्यामुळे या वाघिणीच्या अशा बेपत्ता होण्याचे रहस्य गुलदस्त्यात आहे.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत

हेही वाचा – खबरदार..! मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास…; विदर्भातील कुणबी संघटना आक्रमक

वनविभागाचे काही कर्मचारी गस्तीवर असताना कळमना उपप्रदेशातील कम्पार्टमेंट क्रमांक ५७२ मध्ये त्यांना वाघाची दोन पिल्लं मृतावस्थेत दिसली. तर अन्य एक पिल्लू गंभीर स्थितीत होते. वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ या पिल्लाची सुटका करून प्राथमिक उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव उपचार केंद्रात पाठवले. त्यानंतर त्या ठिकाणी अधिक शोध घेतला असता काही अंतरावर जवानांना वाघाची दोन पिल्ले मृतावस्थेत आढळून आली. तीनही बछड्यांपासून वाघीण बेपत्ता झाली आहे. त्यामुळे भुकेने व्याकूळ झाल्यामुळे दोन बछड्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. एक बछडा वनविभागाने ताब्यात घेतला असून त्याचीही प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर वनविभाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – वर्धा : ‘तो’ वाघ नजरेच्या टप्प्यात, बेशुद्ध करणारी चमू दाखल

सविस्तर पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृत वाघाच्या पिल्लांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दोन्ही पिल्लांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, आता शवविच्छेदन अहवालानंतरच वाघाच्या पिल्लांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. शवविच्छेदन करणाऱ्या टीममध्ये डॉ. कुंदन पोडचेलवार आणि डॉ. दिलीप जांभुळे यांचा समावेश होता. या संदर्भात वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत. वाघिणीचा शोध घेण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. तर वन पथक जंगलात फिरून वाघिणीच्या शोधकार्यात सहभागी झाले आहे. मात्र अजूनही वाघिणीचा शोध लागला नाही, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.