नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची शान असलेला बजरंग नावाचा वाघ आणि छोटा मटका नावाचा वाघ यांच्यात मंगळवारी जोरदार झुंज झाली. या दोघांमधील थरकाप उडवणाऱ्या झुंजीचा व्हिडीओ समोर आला आहे.बजरंग हा वाघ म्हणजे धिप्पाड शरीरयष्टीचा. आजवर झालेल्या झुंजीत तो कधी पराभूत झाला नाही. याउलट त्याने आपले साम्राज्य निर्माण केले. तर मोठा मटका या वाघाचा मुलगा असलेल्या छोट्या मटक्याने ताडोबाच्या बफर क्षेत्रात म्हणजेच नीमढेला क्षेत्रात आपले साम्राज्य उभारले.

हा वाघासुद्धा लहानपणापासूनच धिप्पाड शरीरयष्टीचा आणि आक्रमक. मंगळवारी छोट्या मटक्याने बैलाची शिकार केली. त्यावर हक्क गाजवण्यासाठी बजरंग आला आणि त्यांच्यात झुंज सुरू झाली. अंगावर थरकाप उडवणाऱ्या या झुंजीत बजरंग मृत्युमुखी पडला तर छोटा मटका गंभीर जखमी झाला. त्याला शोधण्यासाठी वनखात्याची १४ जणांची चमू जंगलात गेली आहे.

Story img Loader