मालगाडीच्या दोन वॅगनमधील कपलिंग तुटल्याने रविवारी सायंकाळी हावडा मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. मात्र, वेळीच सुधारणा केल्याने रेल्वे वाहतूक लवकरच पूर्ववत झाली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या संदर्भात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रवीश कुमार सिंग यांनी सांगितले की, नागपूर विभागांतर्गत खात आणि भंडारा दरम्यान मालगाडीच्या वॅगनचे कपलिंग अचानक तुटले. माहिती मिळताच सुधारणेचे काम सुरू करण्यात आले. तोपर्यंत मालदा टाऊन-सुरत एक्स्प्रेस आणि हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस या दोन गाड्या भंडारा रेल्वे स्थानकावर अर्धा तास थांबवण्यात आल्या होत्या. एक तासात कपलिंग जोडून मालगाडी रवाना करण्यात आली. यानंतर इतर पॅसेंजर गाड्यांचे संचालनही सुरू झाले.
First published on: 31-10-2022 at 00:07 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two trains got stuck as coupling of goods train breaks zws