वर्ध्यातील सिंदी रेल्वेलगत गौळ शिवारात विहिरीचे बांधकाम सुरू असताना एक भाग खचल्याने मातीखाली दबून दोन मजुरांचा दुर्दवी मृत्यू झाला.अमोल दशरथ तेंभरे व पंकज प्रभाकर खडतकर अशी मृतांची नावे आहेत.त्यांचे मृतदेह रात्री हाती लागले नाही.
हेही वाचा- नागपूर : मतिमंद तरुणीचे अपहरण करुन बलात्कार; ऑटोचालकाला अटक
आज सकाळपासून मृतदेह काढण्याचे काम परत सुरू झाले. सर्जेराव वरभे यांच्या शेतातील विहिरीत काँक्रीटचे बांधकाम करण्यात येत होते. त्यांच्या कुटुंबातील बापलेक तसेच मयूर व मनोज तेंभरे सुखरूप वाचले. मलब्याखाली पाणी असल्याने मृतदेह काढण्यास अडथळे येत आहे. विशेष बचाव पथक अथक प्रयत्नात आहे.