राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रचारार्थ महिला काँग्रेसतर्फे नागपुरात बुधवारी दुपारी ३ वाजता संविधान चौकातून दुचाकी मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नॅश अली यांनी ही माहिती दिली.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी महिलांची बाईक मिरवणूक काढण्यात येणार आहे. संविधन चौकात काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे मिरवणुकीला हिरवा झेंडा दाखवतील. तेथून ही मिरवणूक सेंट्रल ॲव्हेन्यू येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जाईल व तेथे सांगता होईल.

Story img Loader