आमगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरठाजवळील कालव्याजवळ आमगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या टिप्परने मोटारसायकल स्वारास दिलेल्या धडकेत मोटारसायकल वरील दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली.
हेही वाचा >>> नदीवर पार्किंगसाठी ६० फूट स्लॅब टाकल्याने नागपुरात पूर,ॲक्वा पार्कसाठी नदीवर अतिक्रमण
टिप्पर क्रमांक एम.एच. ३५ ए.जे. १०२१ ने मोटारसायकल क्रमांक एम.एच. ३५ एम.७५६५ ला धडक दिली. मृत महिलामध्ये सत्यशिला ब्रिजलाल बिसेन(३६) व सुनीता सूरजलाल बिसेन(२३)रा. पोकरटोला (टेकरी)ता.आमगाव यांचा समावेश आहे. ठाणा येथे मुलीच्या येथील घरगुती कार्यक्रम आटोपून दिपक ब्रिजलाल बिसेन सोबत मोटारसायकलने गावाकडे जात असतांना ही घटना घडली. मोटारसायकल चालक दिपक बिसेन गंभीर जखमी असल्याने त्यास आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. माहिती मिळताच घटना स्थळी आमगाव पोलीसानी पोहचून गंभीर जखमी ला रूग्णालयात दाखल केले. पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.