लोकसत्ता टीम

बुलढाणा : शेतकरी आणि बैलाचा सण असलेल्या पोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. दोन्ही मृत युवा शेतकरी पुत्र मलकापूर तालुक्यातील आहे. ऐन पोळ्याच्या सणाला शोककळा पसरली आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना

सोमवारी, २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पोळ्याची धूम सुरू असताना दोन युवक पाण्यात बुडून दगावले. दोघांचे मृतदेह हाती लागले असून त्यांच्या मूळ गावात पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मलकापूर तालुक्यातील मलकापूर ते बोदवड (जिल्हा जळगाव) मार्गावरील दोन गावात ह्या दुर्घटना घटना घडल्या. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार हरणखेड (तालुका येथील मलकापूर, जिल्हा बुलढाणा) येथील शेतकरी गावा नजीकच्या व्याघ्र व्याघ्रा नाल्यात बैल धुण्यासाठी गेले होते. दरम्यान जोरदार पावसामुळे व्याघ्रा नाल्याला अचानक मोठा पूर आला.यावेळी बैल धुत असलेला गोपाल प्रभाकर वांगेकर ( वय पंचवीस, राहणार हरणखेड , तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा) वाहून गेला व दगावला.

आणखी वाचा-ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बचाव पथकाने शोध घेऊन गोपाल वांगेकर याचा मृतदेह बाहेर काढला. याच मार्गावरील देवधाबा येथील घटनेत बत्तीस वर्षीय युवा शेतकरी दगावला आहे. बैल धुण्यासाठी खडकी नाला मध्ये इतरासह तो देखील गेला होता. पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने तो वाहून गेला. प्रवीण काशिनाथ शिवदे (वय ३२ वर्ष राहणार देवधाबा तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे. देव धाबा गावातील पोहण्यात तरबेज गावकऱ्यांनी प्रवीण चा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान या दुर्दैवी घटनेने वांगेकर आणि शिवदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात एकच आकांत उसळला आहे.

आमदार घटनास्थळी

दरम्यान मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे।आमदार राजेश एकडे यांना घटनेची माहिती मिळताच ते आपल्या सहकाऱ्यांसह आणि सोबत रुग्णवाहिका घेऊन देव धाबा आणि हरणखेड येथे दाखल झाले. रुग्णवाहिकेतून मृतदेह शव विच्छेदन साठी मलकापूर येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले. यावेळी आमदार एकडे याना गावकऱ्यांना दिलासा देत मृतांच्या वारसाना मदतीचे आश्वासन दिले. या घटनेमुळे दोन्ही गावात पोळा सण साजराच झाला नाही.

आणखी वाचा-गोंदियात ‘हिट अँड रन’, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

दरम्यान मलकापूर तहसीलदार यांच्या कडून घटनांची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हा बचाव शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकात चमू प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक तारासिंग पवार यांच्यासह पोलीस हवालदार इर्शाद पटेल, हवालदार श्रीकांत गाडे, नायक पोलीस संदिप पाटील, पोलीस जमादार गुलाबसिंग राजपूत, जमादार सलीम बरडे, जमादार अमोल वाणी, जमादारसंतोष साबळे, जमादार प्रदिप सोनुने, हवालदार फिरोज कुरेशी यांचा समावेश होता. राजेंद्र पोळ, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच संभाजी पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली आहे.