गोंदिया : गोरेगाव  पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चुलबंद जलाशयाचे अतिरिक्त पाणी वाहून जाणाऱ्या कालव्यात बुधवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साढे पांच वाजताच्या सुमारास दोन तरुणांचा कालव्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.कादीर मतीन शेख (वय २८), कैफ अमीन शेख (वय २१ दोघेही रा. सडक अर्जुनी) अशी मृतांची नावे आहेत.बुधवारी भारत बंद असल्याने कादीर मतीन शेख व कैफ अमीन शेख हे चुलबंद जलाशय येथे सहली करिता आले होते. चुलबंद जलाशयाचे अतिरीक्त पाणी वाहून जाणाऱ्या कालव्याजवळ असतानाच एकाचा तोल धबधब्यात गेला.

 त्यात मोठा डोह असल्याने त्यात सोबती बुडत असताना दुसरा  वाचविण्यासाठी धावला. पण यात दोघांचाही पाण्यात बुडून  मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी मुरदोली सह गोरेगांव तालुक्यात  पसरली. लगेच नागरिकांनी या धबधब्याकडे धाव घेतली. धबधब्यात डोह असल्याने ही माहिती पोलिस पाटील दिलीप मेश्राम व वनपरिक्षेत्रअधिकारी यांना देण्यात आली. पोलिस पाटील मेश्राम यांनी गोरेगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
Mumbai child death water tank
मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू
child found dead in water tank in Bhiwandi
पाण्याच्या टाकीत पाच वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला
boy died Mumbai, water tank, boy died drowning,
मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू
sandeep kshirsagar
“वाल्मिक कराडला अटक करा, अन्यथा आंदोलन”, आमदार क्षीरसागर यांचा इशारा
navi mumbai municipal administration unaware of construction developer of building in koparkhairane
खड्ड्यात पडून मृत्यूप्रकरण; बांधकाम विकासकाविषयी प्रशासन अनभिज्ञ

हेही वाचा >>>वाशीम जिल्ह्यात शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग; राज्यात चाललंय तरी काय?

पण बुधवारी  गोरेगाव बंद  असल्याने ठाण्यातील बहुतांश पोलिस बंदोबस्तात होते. पोलिस सायंकाळी पोहचले सायंकाळ झाल्याने दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी गोरेगांव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.

शेतातील १५ फूट खोल खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू

अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येरंडीदेवी गावात शेतातील पाण्याच्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाला.ही घटना बुधवारी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. रेवता घनश्याम तावडे (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत रेवता तावडे ही तिच्या शेतात गेली होती तर तिचा पती शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेला होता. अशा स्थितीत शेताजवळील सुमारे १५ फूट खोल खड्ड्यात पडून तिचा मृत्यू झाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीय व शेजाऱ्यांनी तिचा शोध सुरू केला.

 घरभर अंधारात त्याची झडती घेण्यात आली. कुटुंबीय व जवळील काही लोकांचा असा अंदाज होता की रक्षाबंधनामुळे ती भावाला राखी बांधायला गेली असावी. सायंकाळी शेळ्या चारून पती घरी परतल्यानंतर त्यानेही शोधाशोध सुरू केली. जवळच्या चान्ना गावात नातेवाईकांना भेटूनही काहीच  कळले नाही.

हेही वाचा >>>‘वित्त विभाग फाईलवर ठाण मांडून बसतो’ उच्च न्यायालयाचा संताप…

इतरत्र ही शोधा शोध केली पण ती न सापडल्याने तो गावी परतला आणि त्याच्याच शेतात त्याचा शोध सुरू केला. गावातील लोकांसोबतच शेतालगत असलेल्या तलावातही शोध घेतला मात्र काहीही सापडले नाही. दरम्यान, रात्री नऊ वाजता वासुदेव हे शेजाऱ्यांसह मेश्राम यांच्या शेताकडे गेले. जिथे खोल खड्डा होता. जे पाण्याने भरलेले होते. बांबूच्या साहाय्याने खड्ड्यातील पाणी शोधण्याचा प्रयत्न केला असता. रेवताबाईचा स्कार्फ पाण्यातून वर आला. त्यानंतर तिचा मृतदेह बांबूने घेरून बाहेर काढण्यात आला.या घटनेची माहिती तत्काळ अर्जुनी मोरगाव पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून रात्री १० वाजता मृताचा मृतदेह अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Story img Loader