नागपूर : दिवाळीनिमित्त वाकी नदीवर पार्टी करण्यास गेलेल्या १२ जणांना नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यापैकी दोघांचा खोल पाण्यात गेल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजता घडली. कुणाल गणेश लोहेकर (२४, स्नेहदीपनगर, जरीपटका) आणि नितेश राजकुमार साहू (२२ स्नेहदीपनगर) अशी मृतांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : विद्यापीठ विधिसभा निवडणूक रिंगणात ‘शिक्षक भारती’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त जरीपटक्यातील १० ते १२ युवकांनी पार्टी करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी प्रतिव्यक्ती २०० रुपये जमा केले आणि त्यातून खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. रविवारी एक वाजता ते वाकी नदीवर पोहचले. काही वेळातच सर्व आंघोळ करण्यासाठी नदीत उतरले. कुणाल लोहेकर आणि नितेश शाहू या दोघांनाही पोहणे येत नव्हते. तरीही खोल पाण्यात गेल्याने ते दोेघेही बुडायला लागले. अन्य कुणालाही पोहता येत नसल्यामुळे त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाने नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश सोळंके यांना माहिती दिली. त्यांनी लगेच वाकी गाठले आणि तेथून पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, रविवार असल्याचे कारण सांगून रात्री उशिरापर्यंत कोणतीही प्रशासकीय मदत मिळाली नव्हती. त्यामुळे दोघांचाही मृतदेह मिळून आले नाही.

हेही वाचा >>> नागपूर : रस्त्यांवर डांबरी ठिगळ, वाहनधारकांची कसरत, निकृष्ट कामांमुळे पुन्हा खड्डे

पार्टीसाठी गेलेल्या युवकांपैकी एकालाही पोहणे येत नव्हते. त्यामुळे नितेश आणि कुणाल बुडायला लागल्यानंतर ‘वाचवा…वाचवा’ असे सगळे ओरडायला लागले. परंतु, कुणीही मदतीला धावले नाही. मित्रांसमोरच दोघांचाही जीव गेला. दोघेही अविवाहित असून कुणाल हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो तर नितेश हा बांधकाम ठेकेदार आहे. दोघांचेही कुटुंबीय वाकी नदीच्या काठावर बसून प्रशासनाच्या मदतीची वाट बघत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two youths died after drowning in the river waki ysh