यवतमाळ : शहरापासून जवळच असलेल्या बोरगाव धरण येथे पोहण्यासाठी गेलेले दोन तरूण पाण्यात बुडाले. ही घटना बुधवारी सायंकाळी उजेडात आली. आदित्य वाके (१७, रा. मच्छी पूल), तन्मय शर्मा (१७, रा. शनी मंदिर परिसर, यवतमाळ) अशी बोरगाव धरणात बुडालेल्या विद्यार्थ्याची नावे आहेत.
इयत्ता अकरावीत शिकणारे चार विद्यार्थी बुधवारी दुपारी बोरगाव धरण परिसरात फिरण्यासाठी गेले. आदित्य , तन्मय यांच्यासोबत सुफियान मलनस व वेदांत श्रीवास हे दोघेही होते. धरण परिसरात आदित्य आणि तन्मय यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. बराच वेळ झाला तरी दोघेही बाहेर न आल्याने धरणाबाहेर असलेले सुफियान आणि वेदांत हे विद्यार्थी घाबरून गेले. त्यांनी घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी पोलिसांना कळविले. पोलीस आणि शोध व बचाव पथकाने रात्री घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली. मात्र आंधार पडल्याने व धरण परिसरात पाऊस कोसळत असल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. आज गुरुवारी सकाळपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर सकाळी १० वाजताच्या सुमारास दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले, अशी माहिती यवतमाळचे तहसीलदार योगेश देशमुख यांनी दिली.
हेही वाचा…भंडारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नाकारली
पंधरा दिवसांत तिसरी घटना
पंधरा दिवसापूर्वी यवतमाळ नजिकच्या कापरा येथील धबधब्यावर पोहायला गेलेल्या श्याम सुनील जोशी या अकरावीतील विद्यार्थ्याचाबुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवडाभरापूर्वी यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथील धबधब्यावर पोहायला गेलेला घाटंजी येथील देवराज गेडाम हा तरुण बुडाला होता. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. यवतमाळ नजीक अनेक पावसाळी पर्यटन स्थळ आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने शहरालगत बोरगाव, कीटा कापरा, मनदेव, पंचधारा, चौसाळा येळाबारा आदी ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. या बहुतांश ठिकाणी छोटे-मोठे धबधबे आणि जलाशय आहेत. या ठिकाणी तरुण, तरूणींसह पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र प्रशासनाकडून येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने पर्यटक पाण्यात उतरतात आणि पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गमावून बसत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे अशा पर्यटन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच नागरिकांनी अशा ठिकाणी धाडस करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.