यवतमाळ : शहरालगत कोळंबी जंगलात दोन युवकांच्या हत्येची घटना उजेडात आली. यवतमाळ शहरातील रहिवासी असलेल्या दोन्ही युवकांचा सोमवारी रात्रीच्या सुमारास खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. या दुहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उज्ज्वल छापेकर (३०, रा. डेहणकर ले आऊट, यवतमाळ) व अविनाश कटरे (३२, रा. चापडोह पुनर्वसन, यवतमाळ) अशी मृतांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे. उज्ज्वल व अविनाश हे दोघे मित्र आहेत. उज्ज्वल छापेकर हा वडिलांच्या सेंट्रिंगच्या व्यवसायात मदत करून रोज मजुरीची कामे करत होता. अविनाश उज्ज्वल सोबत राहायचा. सोमवारी सायंकाळी ते घाटंजी येथे गेले असावे. तेथून रात्री परत येताना कोळंबी फाटा या गावातील जंगलानजीक त्यांना दुचाकीवरून पाडून प्रथम मारहाण करण्यात आली. मारहाणीत बेशुद्ध झाल्यानंतर दोघांवरही चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

हेही वाचा – पंतप्रधानांची ‘मन की बात’ कार्यक्रम म्हणजे जनतेच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी: नाना पटोले

अविनाशच्या डोक्यावर दगडाने प्रहार करण्यात आले. रात्री १० वाजताच्या नंतर हे हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येते. यवतमाळ ग्रामीण, वडगाव जंगल ठाण्याचे पोलीस घटनेची माहिती होताच घटनास्थळी पोहोचले. मात्र मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. मारेकऱ्यांनी मृतदेह छिन्नविछिन्न केले आहेत. घटनास्थळावर खायचे समोसे आदी वस्तू आढळल्या. मारेकरी चार ते पाच संख्येने असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

हेही वाचा – सावधान..! विदर्भात आज पुन्हा मुसळधारेचा इशारा

या हत्याकांडास गुन्हेगारी किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी कारणीभूत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले. अधिक तपास सुरू आहे.