नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये (नागपूर विभाग) २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत सतत विषमज्वराची (टायफॉईड) रुग्णसंख्या वर्षाला तीन हजाराहून खाली होती. परंतु, २०२२ मध्ये ही रुग्णसंख्या दुप्पटीहून जास्त म्हणजे तब्बल ६ हजार ८५८ एवढी आढळली आहे. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या वर्षभरात विषमज्वराचे २ हजार ७७१ रुग्ण नोंदवले गेले होते. परंतु, एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही रुग्णसंख्या २०२१ मध्ये २ हजार ८३६ तर २०२२ मध्ये तब्बल ६ हजार ८५८ रुग्ण एवढी नोंदवली गेली. परंतु, या आजाराचा एकही मृत्यू नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.
पूर्व विदर्भात विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ
ही रुग्णसंख्या २०२१ मध्ये २ हजार ८३६ तर २०२२ मध्ये तब्बल ६ हजार ८५८ रुग्ण एवढी नोंदवली गेली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 15-02-2023 at 11:04 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Typhoid fever cases increase by double in east vidarbha mnb 82 zws