यवतमाळ : महिलांचा मान सन्मान करण्यासाठी आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील परिस्थिती बदलली आहे. या योजनेने विरोधकांचे सत्तेत बसण्याचे मनसुभे उधळल्याने विरोधक आता महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसल्याचे ‘ नॅरेटिव्ह’ पसरवत आहे, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

यवतमाळ येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानासाठी आले असता मंत्री सामंत यांनी आज शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. एका चिमुरडीच्या आडून विरोधक गलिच्छ राजकारण करत असून राज्यात महिला असुरक्षित असल्याचे सांगत जनमानसात सरकारची चुकीची छबी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र बंदची हाक देवून विरोधकांनी सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला, त्यासाठी न्यायालयाचे आभार मानले पाहिजे, असे सामंत म्हणाले.

Nagpur, Raj Thackeray, Ladki Bahin Yojana, raj thackeray on ladki bahin yojna, free money, employment, farmers' demands
राज ठाकरे म्हणतात “लाडकी बहीण योजना लवकरच बंद…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Raj Thackeray on Badlapur
Raj Thackeray : “रोज येणाऱ्या अत्याचारांच्या वृत्तांमागे राजकारण की येणाऱ्या निवडणुका?”, राज ठाकरेंचा थेट प्रश्न; म्हणाले, “सरकारला बदनाम…”
raj thackeray on sharad pawar
Raj Thackeray Press Conference: “शपथा कसल्या घेताय? तुमच्या हातात…”, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला; ‘त्या’ कृतीवरून केली टीका!
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
Raj Thackeray On rape case in maharashtra
Raj Thackeray: लोकसभेला झालेले मतदान अँटी मोदी आणि अँटी शाह; मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे काय म्हणाले?
Nagpur, cyber crime, financial fraud, sextortion, Maharashtra, Mumbai, Pune, Nagpur, trained staff, cyber police, public awareness, cyber crime news
सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात अडकविण्यासाठी करतायेत तरुणींचा वापर; दिवसाला शेकडोंवर…
Pakistan Musakhel Bus Attack News in Marathi
Pakistan Bus Attack: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये पंजाबहून आलेल्या २३ जणांची गोळ्या झाडून हत्या; बसमधून सगळ्यांना उतरवलं आणि…

हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होण्यापूर्वीच पावसाची जोरदार हजेरी

समाजात भांडण लावण्याचे काम विरोधक करीत आहे. सभागृहात एक तर सभागृहाच्या बाहेर ते अन्य भाषा बोलतात, अशी टीका त्यांनी महविकास आघाडीवर केली. मराठा आरक्षणाबाबत विरोधक आपली भूमिका स्पष्ट का करत नाही, असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला. बदलापूरची घटना निंदनीयच आहे. शाळा कोणाचीही असो त्यावर कारवाई केली पाहिजे आणि सरकारची भूमिका तशीच असल्याचेही ते म्हणाले. अशा घटनेतील नराधमांना ठेचून काढण्याचीच भूमिका सरकारची आहे. राज्यात महिला सुरक्षितता अभियान अधिक भक्कमपणे राबविल्या जाईल. कुठल्याही महिलेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असे कठोर पाऊल सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालय जेव्हा विरोधकांच्या बाजूने निर्णय देते तेव्हा विरोधकांना तो निर्णय मान्य असतो. मात्र त्यांच्या विरोधात निर्णय देते त्यावेळी त्यांना न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप असतो, असा दुटप्पीपणा विरोधक करतात. खरंतर न्यायालयाच्या निर्णयाबद्दल भूमिका व्यक्त करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. या संदर्भात न्यायालयाने विरोधकांवर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.

हेही वाचा…Raj Thackeray : “रोज येणाऱ्या अत्याचारांच्या वृत्तांमागे राजकारण की येणाऱ्या निवडणुका?”, राज ठाकरेंचा थेट प्रश्न; म्हणाले, “सरकारला बदनाम…”

यवतमाळ पाच हजार कोटींचा उद्योग

यवतमाळात पाच हजार कोटींचे टेक्स्टाईल पार्क उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. उद्योजकांनी शुल्क भरण्याबाबत असहमती दर्शविल्याने हा निर्णय मागे पडला. मात्र सरकारकडून त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू असून यवतमाळात लवकरच पाच हजार कोटींचा उद्योग सुरू होईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.