Uday Samant Nagpur Winter Session : उद्धव ठाकरेंनी प्रशिक्षण द्यावे पण आत्मचिंतन करावे, असा टोला शिवसेना नेते (एकनाथ शिंदे गट) उदय सामंत यांनी लगावला. विधान भवन परिसरात ते बोलत होते.
उदय सामंत पुढे म्हणाले, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारी विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना प्रशिक्षण देणार आहेत. नवीन आमदारांना प्रशिक्षण देणे काही वावगे नाही पण शिवसेनेची संख्या कमी झाल्यासंदर्भात आत्मचिंतनही या प्रशिक्षण कार्यशाळेत करावे, असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
हेही वाचा – Nana Patole : नाना पटोलेंकडून अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी, म्हणाले…
शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत, नरेंद्र भोंडेकर हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत, तानाजी सावंत यांनी डीपीवरून शिंदेंचाही फोटो काढला आहे, यासंदर्भात सामंत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, शिंदे साहेब हे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालत आहे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काही काळ नाराजी असेल पण आम्ही बारा मंत्री त्यांना मंत्रिपदासारखेच सन्मान देऊ त्यांची किरकोळ नाराजी दूर करू.
हेही वाचा – ‘हा तर मुनगंटीवार यांच्यावर अन्याय’, समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया
शिंदेंना गृहमंत्रिपद मिळावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याच्या संदर्भात प्रश्न विचारला असता सामंत म्हणाले की आग्रह धरणे दावा करणे हा आमच्या अधिकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याला मोठे पद मिळावे अशी इच्छा असते.