लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : प्रत्येकाचा मनात काय सुरु असते, कुठं जायचे ते सांगत नाही. दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्ही ठाकरेंसोबत असल्याचा निर्वाळा दिला. पण ही वज्रमूठ किती दिवस टिकते बघू. कोणी आव्हान दिल्यावर प्रति आव्हान देत गरजेचं नाही, असे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत म्हणाले. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी चर्चा झालेली नाही. यावर सविस्तर चर्चा करू, राजन साळवी पक्षात येताना त्यांची इच्छा आकांक्षा काय आहे? माझे मोठे बंधू साळवींचा पराभव करून त निवडून आले. त्यांनाही विश्वासात घ्यायचा आहे. सगळ्या बाबींचा विचार करुन निर्णय घेऊ, असे सामंत म्हणाले.
ठाकरे गटातील आजी माजी आमदारांशी
चर्चा झाली किंवा नाही हे जाहीरपणे सांगायची गरज नसते. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात काम करण्यासाठी अनेक जण महाराष्ट्रात इच्छुक आहे. त्याचे पडसाद तुम्हाला बघायला मिळत आहे. माझ्याकडे १५ तारखेला आभार दौरा आहे. त्यातही मोठे बदल दिसेल, असे सामंत म्हणाले.
शिंदे खटाला उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाबाबत सामंत म्हणाले, आम्हाला शिवसेना वाढवायची आहे. पायाला भिंगरी बांधून फिरण्याचा काम एकनाथ शिंदे यांनी केलं. त्याचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. शिवसेनेचे सभासद जोडणे अभियान सुरू आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे… सरकारमध्ये मंत्री म्हणून आम्ही काम करीत आहोत. शिवसेना ताकदीने उभी राहिली पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे.
इंडिया आघाडीचा प्रभाव ओसरला
इंडिया आघाडीचा प्रभाव फार काळ टिकणार नाही हे आम्ही अगोदरच सांगितलं होते. स्वतःचा स्वतः चे अस्तित्व टिकवण्याशिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांना पर्याय नाही. आघाडीच्या आमदारांचे भविष्य पुढील पंचवीस वर्षासाठी अंधकारमय दिसते, असे सामंत म्हणाले.
केजरीवाल यांच्या पराभव का झाला.
याचे उत्तर केजरीवाला यांनी दिले आहे. कुठलाही पराभव हा स्वतःमुळे झाला हे, कुणी मान्य करणार नाही. परंतु केजरीवाल यांनी लोकशाहीला सन्मान करीत पराभवाचे आत्मचिंतन करत असल्याचे सांगितले. पराभव झाला तरी केजरीवाल लोकशाहीचा सन्मान करतात.. बाकीचे (संजय राऊत) लोकशाहीचा अनादर करतात, असा टोला सामंत यांनी हाणला.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी नाही
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली. त्यावर बोलताना सामंत म्हणाले,विरोधाकांनी काय कराव हा लोकशाहीतील त्यांचा अधिकार आहे. सध्या त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. विरोधकानी काय करावं ही त्यांची भूमिका आहे. प्रकरण कोर्टात आहे. जे काही चौकशीतून दोषी येतील. त्यांना फासांवर लटकवल पाहिजे. जोपर्यंत चौकशी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत धनंजय मुंडे बद्दल बोलणे योग्य वाटत नाही. त्याच्यातला एकही मारेकरी सुटू नये हीच भूमिका शिवसेनेची असणार आहे.