नागपूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस आहे. ते रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पवार आज नागपूरमध्ये आले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेसुद्धा नागपूरमध्ये आहेत. ठाकरेसुद्धा संघर्ष यात्रेला उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पवार यांनी वाढदिवस साजरा करणार नाही असे सांगितले असले तरी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण पवार यांची भेट घेणार आहेत. नागपुरात असलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीसुद्धा पवार यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाली.

हेही वाचा – “राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडेंच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी करा”, उद्धव ठाकरे यांची मागणी; म्हणाले…

हेही वाचा – “जुनी पेन्शन लागू न केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांचे कामबंद”, आमदार किरण सरनाईक यांचा इशारा

उद्धव ठाकरे यांनी नागपुरात आल्यावर मुंबईतील धारावीच्या मुद्यावरून भाजपावर टीका केली होती, ठाकरे यांचा विकासाला विरोध असल्याचा आरोप केला होता. शरद पवार सोमवारी नाशिकमध्ये कांदा उत्पादकांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी कांदा निर्यातबंदीवरून केंद्र सरकावर टीका केली होती. आज हे दोन्ही नेते संघर्ष यात्रेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार असल्याने ते काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray aditya thackeray meet sharad pawar to wish him on his birthday cwb 76 ssb