शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ( १० जुलै ) उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला नागपूर येथे आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक क्लिप ऐकवत हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेले कलंक आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांची परिस्थिती सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी विचित्र झाली आहे. बोलो तैसा चाले, त्याची वंदावी पावले. अलीकडे देवेंद्र फडणवीस बोलले, ‘मी पुन्हा येईन, असं बोललो होतो. पण, दोघांना घेऊन आलो.’ ते दोघेजण कोण आहेत?”

हेही वाचा : “गावठी कट्ट्यावर कर्ज देणारी अवलाद…”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

यावेळी एक ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरे यांनी ऐकवली. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसशी युती शक्य नाही. आपत धर्म नाही, शाश्वत नाही. एकवेळ सत्तेशिवाय राहू. एकवेळी अविवाहीत राहणं पसंत करेल. पण, राष्ट्रवादीशी युती करणार नाही.’

“देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.

हेही वाचा : “मर्दांची अवलाद असाल, तर सरकारी यंत्रणा सोडून समोर या”, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“देवळात घंटा बडवणारं आमचं हिंदुत्व नाही. पहिली हिंदुत्वाच्या पायावर कुऱ्याड २०१४ साली भाजपाने मारली आहे. हे हिंदुत्व ज्या दिशेने घेऊन चालले आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.