अकोला : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची महाराष्ट्राला वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होत नव्हती. महाराष्ट्र लुटण्यासाठीच भाजपने मविआ सरकार पाडले, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला. बाळापूर येथे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मविआचे पदाधिकारी उपस्थित होते. चुकीच्या माणसाला मोठं केलं. ही सडलेली माणसे मला नको होती. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चौफेर टीका केली.

मविआ सरकारमध्ये सगळी मोठी खाती गद्दारांना दिली होती. त्यांनी ओरबडले आणि चोरी उघडकीस येणार, हे लक्षात येताच पळून गेले. मुख्यमंत्री पदाचा मोह कधी नव्हताच. क्षणात वर्षा बंगला सोडला. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू होते आणि गद्दारांच्या हातात ग्लास होते, अशी टीका ठाकरे यांनी केली.

Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा – भंडारा: साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकांचा सभास्थळाहून काढता पाय

भाजपने पाठीत खंजीर खुपसला. भाजपसोबत राहिलो असतो तर त्यांनी मोदी, शहांच्या मागे फिरवले असते. सडलेली मानसिकता आहे. करोना काळात देखील महाराष्ट्राचा विकास सुरू होता. हे त्यांना खुपत होते. भाजपने गद्दारी करून हिंदुत्व संपवले. खरा भाजप आता राहिला नाही. सर्व उपरे व लुटारू बसले आहेत. शिवसेनेने भाजपला खांद्यावर घेऊन महाराष्ट्र फिरवला. तोच आता शेवटचा खांदा भाजपला देणार आहे. सगळे भ्रष्टाचारी एकत्र आणावे आणि भाजप वाढवावा, हे त्यांचे हिंदुत्व. आमचे हिंदुत्व घर पेटवणारे नाही, तर घरातील चूल पेटवणारे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पक्षाचे नाव, चिन्ह चोरले, ते दरोडेखोर आहेत. निवडणुकीनंतर ते शेती करायला जातील.

शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. विदर्भाने सर्वाधिक आमदार भाजपला निवडून दिले, म्हणून ते मुख्यमंत्री पदावर बसू शकले. मात्र, विदर्भाची अधोगती झाली. शेतकरी आत्महत्यांनी विदर्भ होरपळत आहे. आता विदर्भाने ठरवले पाहिजे, की महायुतीचा एकही आमदार निवडून दिला नाही पाहिजे. मविआ सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. पाच वर्षांत आणखी एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे नियोजित होते. मात्र, गद्दारांनी ते होऊ दिले नाही. कोणत्या तोंडाने ते मत मागत आहेत, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

‘वादा १५ लाखांचा, दिले १५०० रुपये’

नरेंद्र मोदी १५ लाख रुपये देतो बोलले होते, दिले काय तर पंधराशे रुपये. घाईगडबडीत राम मंदिर, संसद भवन बांधले, ते पण गळके. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महाराजांचा ऐवढा अपमान आजपर्यंत कोणीही केला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. हे जाहीर करताच देवेंद्र फडणवीसांच्या पोटात दुखयला लागले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Story img Loader