वर्धा : विदर्भ दौऱ्यावर असलेले सेना नेते उद्धव ठाकरे हे नागपुरातून सकाळी निघाले. यवतमाळ येथे जात असताना वर्धा वळणमार्गावर कारला चौकात त्यांचा चाळीस गाड्यांचा ताफा करकचून ब्रेक मारत थांबला. ठाकरे गाडीतून उतरले. त्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. या ठिकाणी असलेल्या हाई व्ह्यू या हॉटेलच्या दिशेने त्यांची पावले वळली. शिवसैनिकांची नारेबाजी झाली. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर त्यांचे जानव्ही मेघे यांनी औक्षण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – उद्धव ठाकरेंचे नागपूर विमानतळावर दणक्यात स्वागत

आत जाताच प्रथम त्यांनी दर्शनी भागात असलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. या ठिकाणी नाश्ता व कार्यकर्त्यांसोबत संवाद ठरला होता. मात्र सूचना आली आणि ठाकरे परत जाण्यास निघाले. जिल्हाप्रमुख अनिल देवतारे लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना म्हणाले की, आम्ही सर्व व्यवस्था केली होती. हॉटेल मालक प्रतीक मेघे यांनी खबरदारी घेत सरबराईची तयारी ठेवली. पण सेना भवनातून निरोप आल्यावर रद्द करावे लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या ठिकाणी त्यांनी केवळ चहा पाणी केल्याचे समजले. पण आकस्मिक थांबा या महामार्गावर चांगलाच चर्चेत आला आहे.