यवतमाळ : यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. मात्र उमेदवार जाहीर होतील तेव्हा होतील, वातावरण निर्मिती झालीच पाहिजे, यावर सर्व प्रमुख पक्षांनी आणि नेत्यांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ-वाशिम, चंद्रपूर-आर्णी व हिंगोली-उमरखेड या तिन्ही लोकसभा क्षेत्रात सध्या राजकीय दौरे आणि नेत्यांच्या सभांची रेलचेल वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन आठवड्यांपूर्वी महिला मेळाव्यातून जनतेला अप्रत्यक्ष साद घातल्यानंतर आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात धडाडणार आहे. या मतदारसंघात शिवसेना (उबाठा)चे संजय देशमुख हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार राहण्याची शक्यता आहे. मुळचे शिवसैनिक असलेल्या संजय देशमुख यांनी आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी वेळोवेळी पक्षीय भूमिका बदललेल्या आहेत.

Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Aditya Thackeray cricket
ठाकरे बंधू खेळामध्ये रमले; प्रचारादरम्यान तरुणाईमध्ये मिसळले, क्रिकेट आणि फुटबॉल खेळत क्षणभर विरंगुळा
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Sanjay Raut slams Raj Thackeray (2)
Sanjay Raut on Raj Thackeray: ‘ते ठाकरे असतील तर मी राऊत’, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

हेही वाचा…वाशिम : महायुतीकडून चंद्रकांत ठाकरे ? बॅनरमुळे चर्चेला उधाण !

शिवसेना, अपक्ष, काँग्रेस, पुन्हा शिवसेना (उबाठा) असा त्यांचा प्रवास राहिला आहे. महाविकास आघाडीत यवतमाळ-वाशिमची जागा मिळावी यासाठी फार रस्सीखेच नाही. मात्र ‘इलेक्टिव्ह मेरीट’चा विषय पुढे आला तर काँग्रेसमधून या जागेवर उमेदवारीचा दावा केला जावू शकतो. सध्यातरी शिवसेना (उबाठा)चे कार्यकर्ते मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्याच अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चार सभांचे नियोजन यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात करण्यात आले आहे.

१२ आणि १३ मार्च रोजी ठाकरे यांच्या या सभा होणार आहेत. मंगळवारी १२ ला सकाळी राळेगाव येथे, संध्याकाळी पुसद येथे, तर बुधवारी १३ ला सकाळी कारंजा आणि संध्याकाळी वाशिम येथे या सभा होणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे हे पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहेत. एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे हे सुद्धा यवतमाळातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल फुंकणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा…धक्कादायक! शाळेतील शिक्षिकांकडून मारहाण अन् नववीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

…आणि पुसदच्या सभेचे स्थळ बदलले

शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा १२ मार्च रोजी पुसद येथील स्व. शेषराव पाटील जिनिंग आणि प्रेसिंगच्या प्रांगणात आयोजित केली आहे. मात्र पुसदच्या ‘बंगल्या’हून या जिनिंगच्या प्रांगणात सभा घेवू नये, असा थेट निरोप आयोजकांना देण्यात आला आणि सभेसाठी नवीन स्थळ शोधणे सुरू झाले. पुसद येथील माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पॅनलची जिनिंग प्रेसिंगमध्ये सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेच्या आयोजकांना सभेसाठी ना-हरकत प्रमाणत्रही दिले होते.

हेही वाचा…शिकारी ‘शाहीन फाल्कन’ पाच महिन्यांपासून यवतमाळात मुक्कामी

परंतु, सध्या दिल्लीत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मनोहर नाईक यांच्या स्नुषा व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या सहचारिणी मोहिनी नाईक यांना भाजपकडून उमेदवारी देण्याबाबत खल सुरू आहे. त्या अनुषंगाने भाजपने येथे मोहिनी यांना उमेदवारी दिल्यास उगाच विरोधकांच्या सभेला आपल्या जिनिंगची जागा दिल्याची नामुष्की नको म्हणून सभा स्थळ बदलण्याची सूचना नाईक यांच्या आग्रहावरून करण्यात आली. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही नाईकांच्या विनंतीला मान देत सभास्थळ बदलण्याचा निर्णय घेतला.