बुलढाणा: न्यायालयीन व वरिष्ठ पातळीवरील अन्य लढे देतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बंडखोर आमदारांना शह देण्यासाठी आत्तापासूनच सक्षम पर्यायांचा शोध सुरू केल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, शिंदेंसह उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.शिवसेना आमदारांचे बंड ‘मातोश्री’च्या जिव्हारी लागले आहे. यामुळे अनेक पातळ्यांवर लढत असताना उद्धव ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना आव्हान देण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांचा शोध सुरू केला आहे. यासाठी पक्षीय यंत्रणाच कामाला लावण्यात आल्याचे वृत्त आहे. संजय देशमुखपाठोपाठ बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा >>>गडचिरोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार ; मेंढेबोडी मार्गावरील घटना

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”

चर्चा तथ्यहीन, राजकीय अफवाच
यासंदर्भात संपर्क केला असता सध्या भाजपात असलेले शिंदे यांनी, या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे सांगितले. आपण तीनदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्याने अशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण ही केवळ राजकीय अफवा असल्याचे शिंदे म्हणाले. मी सध्या भाजपात असून समाधानी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, अशा कोणत्याही राजकीय हालचाली सुरू नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनीही स्पष्ट केले. आमच्या कोणत्याही नेत्यांकडून मला विचारणा झाली नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>>नागपूर : तीन हजार किलोचा चिवडा ; विश्वविक्रमाला सुरूवात

मतदारसंघाचा राजकीय इतिहास असा
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून २०१९ पर्यंतच्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तीनदा आमदार होण्याचा विक्रम शिंदेंच्या नावावर आहे. सन १९९५, २००४ आणि २००९ च्या निवडणुकांत त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीतर्फे लढत देत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड हे विजयी होऊन विधानसभेत पोहोचले. या लढतीनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १९९२ च्या पालिका निवडणुकीत प्रथमच शिवसेनेचे ३ नगरसेवक निवडून आले होते. त्यात शिंदे व गायकवाड यांचा समावेश होता. काही वर्षे सहकारी असलेल्या या दोन नेत्यांत निर्माण झालेले वितुष्ट नंतर राजकीय हाडवैर बनले. ते आजही कायम आहे.