अमरावती :‎ माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्‍यात दंगली व्‍हाव्‍यात, हे नेहमीच वाटत असते. मिरजच्‍या दंगलीमागेसुद्धा उद्धव ठाकरेच होते. आतासुद्धा राज्‍यात दंगली घडवण्‍यामागे उद्धव ठाकरे यांचाच हात असल्‍याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्‍ट केली, तर सगळे सत्‍य बाहेर येईल, असेही ते म्‍हणाले.

अमरावतीत पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्‍हणाले, उद्धव ठाकरे हे पुन्‍हा मुख्‍यमंत्री होण्‍याचे स्‍वप्‍न पाहत आहेत. त्‍यांना दंगली घडवून आणायच्‍या आहेत का, याचा शोध घेतला पाहिजे. सध्‍याचे कार्यक्रम थोडे बंद करण्‍यास उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी सांगितले पाहिजे, असेही राणे म्‍हणाले.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
uddhav thackeray Nana Patole
मनपा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना आमनेसामने, एक्सवर राडा

हेही वाचा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात, “नाव सत्तार! सत्ता कुणाचीही असो मी मंत्रीच…”

राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना जिवे मारण्‍याची धमकी मिळणे, ही दुर्देवी बाब आहे. त्‍यांना धमकी देणारा अमरावती शहरातला भाजपाचा कार्यकर्ता असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे, पण पोलिसांनी कुठलीही चौकशी केली नसताना राष्‍ट्रवादीच्‍या अनेक नेत्‍यांनी आमच्‍या कार्यकर्त्‍याचे फोटो समाज माध्‍यमांवर प्रसारीत केले. दाऊद इब्राहिमचा साथ देणाऱ्या नवाब मलिक यांच्‍याबाबत आपुलकी आणि प्रेम ते लोक बाळगू शकतात, मग आम्‍ही आमच्‍या कार्यकर्त्‍यांची पाठराखण करणे गैर नसल्‍याचे नितेश राणे म्‍हणाले.

आज राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा स्‍थापना दिवस आहे, त्‍या पर्वावर त्‍यांच्‍या घड्याळीचे काटे व्‍यवस्थित चालावे, अशी अपेक्षा मी करतो. आता हिंदूंवरही राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने प्रेम करावे, यासाठी त्‍यांना शुभेच्‍छा देतो, असा टोला राणे यांनी लगावला.

हेही वाचा – भंडारा: आकाश मार्गिकेच्या छताची टीनपत्रे उडू लागली अन् वाटसरुंच्या काळजाचा ठोका चुकला…

संजय राऊत यांना जिवे मारण्‍याची धमकी मिळाल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यांना अशी धमकी देणारा ठाकरे यांच्‍याशिवाय दुसरा कुणी असू शकत नाही. ठाकरे यांच्‍या घरी नोकरी करणारे संजय राऊत आदित्‍य ठाकरे यांना नको आहे, असेही नितेश राणे म्‍हणाले.

Story img Loader