नागपूर : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. या नवीन राजकीय घडामोडीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात जाऊन पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याबाबत शनिवारी रविभवन येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे रविवारी (९ जुलै) सकाळी ९.३० वाजता नागपुरात पोहोचतील. येथून ते यवतमाळला जातील. पोहरादेवी येथे दुपारी दोन वाजता दर्शन घेतल्यावर ते दुपारी ३ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील तर ३.३० वाजता वाशीममधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. अमरावती मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता अमरावती तर ११.३० वाजता अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी १ वाजता अकोला-अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तेथून ते नागपूरकडे निघतील. वाटेत सालई खुर्द, कोंढाळी, अमरावती रोडवरील निर्मल टेक्सटाईल्स येथील कामगारांची भेट घेतील. त्यानंतर नागपुरातील देशपांडे सभागृहात संध्याकाळी ६ वाजता नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

हेही वाचा – अवघ्या सहा महिन्यांत ९५ हून अधिक वाघांचा मृत्यू; २०१८ पासून संख्येत दोनशेने वाढ

ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी विनायक राऊत शनिवारी नागपुरात दाखल झाले. बैठकीला पक्षाचे पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, सहसंघटक सतीश हरडे, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, देवेंद्र गोडबोले, नितिन तिवारी, दीपक कापसे, शिल्पा बोडखे, सुशीला नायक, सुरेखा खोबरगडे आणि इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray in vidarbha for the first time after the split of ncp party mnb 82 ssb
Show comments