नागपूर : देशाच्या नागरिकांनी दहा वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सत्ता दिली. या काळात ‘मन की बात’च्या माध्यमातून विविध योजनांची घोषणा करण्यात आली. अनेक जाहिराती बघायला मिळाल्या. प्रत्यक्षात नागरिकांच्या हाती काहीच आले नाही. त्यामुळे आता भाजपा सत्ताकाळातील अपयश ‘होऊन जाऊ दे चर्चा’ हा उपक्रम राबवून जनतेसमोर समोर आणा, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारी आयोजित पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, भाजपाचे सरकार केंद्रात आल्यावर २०१४ ते आजपर्यंत दहा वर्षांत केंद्र सरकारकडून महिलांशी संबंधित सौभाग्य योजना, उज्ज्वला योजना, स्त्रीधन-जनधन योजनेसह अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. शासकीय जाहिरातीत त्यांचा लक्षावधी-कोट्यवधींना लाभ मिळाल्याचे सांगण्यात आले. विविध शहरांना भेटी दिल्यावर या योजनांचा लाभ लोकांना मिळाला असेल, असे वाटले. परंतु प्रत्यक्षात कुठेही लाभ मिळालेला दिसत नाही. याबाबत खुल्या पद्धतीने बोलले जात नाही. त्यामुळे खरे वास्तव लोकांपुढे येत नाही. त्यामुळे ‘चाय पे चर्चा’ प्रमाणेच ‘होऊन जाऊ दे चर्चा’च्या माध्यमातून घरा-घरात जाऊन यावर चर्चा घडवून आणा आणि सरकारचे पितळ उघडे पाडा, असे ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Why Shiv Sena Thackeray group leaders are not stopping their party defection
ठाकरे गटातील गळती का थांबत नाही ?
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न

हेही वाचा – अकोला: मध्य रेल्वे मार्गावर गाड्यांचा खोळंबा; ‘या’ गाड्या रद्द, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, रुळाखालील भराव वाहून गेल्याचा परिणाम

पी.एम. केअर फंडात कोट्यवधींचा निधी गोळा झाला. त्यामुळे खर्च उघड केला जात नाही. हा फंड सरकारचा नसल्याचे सांगण्यात येते. परंतु देशाच्या नागरिकांच्या निधीतून या फंडात पैसे गोळा करून कोणत्या दरात मुखपट्टी, व्हेंटिलेटर, औषध घेतले हे देशाला कळायला हवे, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – खबरदार..! ट्रॅव्हल्सच्या प्रवाश्यांचे संपूर्ण नाव, पत्ता नसल्यास होणार कठोर कारवाई

कोट्यवधींचा कोळसा घोटाळा – दानवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या कोराडीतील महानिर्मितीच्या वीज निर्मिती प्रकल्पात कोट्यवधींचा कोळसा घोटाळा सुरू आहे. येथे निकृष्ट कोळशाचा पुरवठा केला जात असून सर्व कंत्राटदार सत्ताधाऱ्यांच्या जवळचे आहेत. निकृष्ट कोळशाने वारंवार वीज निर्मिती प्रभावित होत असून त्याकडे लक्ष दिले जात नाही. नागपुरात २४ तास सोडा तासभर पाणी मिळत नाही. गडचिरोलीतील सूरजागड प्रकल्पात केवळ २ स्थानिकांना अभियंत्याची तर ५ हजारांपैकी ५०० जणांना शिपाई, चौकीदाराची नोकरी दिली गेली, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

Story img Loader