शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळमधील पोहरादेवीच्या दर्शनाने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या फुटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “जसे दिसते, तसे पक्षफुटीकडे पाहत आहे,” असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पूर्वी पक्ष फोडला जायचा. आता पक्ष पळवला जात आहे. पक्ष पळवल्यानंतर सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळत आहे. ‘ही परंपरा महाराष्ट्र आणि देशासाठी वाईट आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही बरोबर आहोत,’ असं आम्हाला लोकांकडून सांगितलं जात आहे,” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “काँग्रेस लुट की दुकान, झुठ का बाजार हैं”, मोदींच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, “त्यांनी चुकीने…”

विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांना नोटीस बजावली आहे. याकडे कसं पाहता? असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने अर्थ काढून दिला आहे, यापलीकडे कोणालाही पाहता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. त्या निकालाच्या चौकटीत अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. चौकटीच्या बाहेर जर निर्णय दिला, तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत.”

हेही वाचा : “अनुभवाचे बोल!” रुपाली चाकणकरांनी शेअर केला सुप्रिया सुळेंचा फोटो; म्हणाल्या, “काही गोष्टी…”

विदर्भ दौऱ्यावर भाजपाने टीका केली आहे, याबद्दल विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “भाजपा काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिला नाही. दुसऱ्यांवर दोषारोप करण्याचं भाजपाने सोडून द्यावं. पहिलं आपल्या घरात बाजरबुणगे घुसून घेत आहेत, त्यांचा संभाळ करावा.”

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray on ncp split ajit pawar join shinde group ssa