नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करण्याची घोषणा केली होती. त्याची सुरुवात रविवारी विदर्भातून झाली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारात – अरविंद सावंत
उद्धव ठाकरे यांचे रविवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. तेव्हा शिवसैनिकांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले. जय शिवाजी, जय भवानी, आवाज कुणाचा – शिवसेनेचा अशा घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला होता. येथून ठाकरे यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवीकडे रवाना झाले. सोमवारी त्यांचा नागपुरात मेळावा आहे.
First published on: 09-07-2023 at 12:21 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray received a big welcome at nagpur airport cwb 76 ssb