लोकसत्ता टीम

नागपूर : आमदार, खासदार का सोडून जातात याबाबत उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याऐवजी ते भाजपवर टीका करतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”
denial of 30 percent reservation for women along with scheduled castes tribes and OBCs is matter of concern says Sudhir Mungantiwar
आरक्षण नाकारणे हे देशासाठी चिंताजनक – मुनगंटीवार
Villagers shared their experience after explosion in ordnance manufacturing company Bhandara
जोरदार आवाज झाला, पत्रे उडाले; स्फोटानंतर ग्रामस्थांनी सांगितला अनुभव
Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
Image of Amit Shah
Amit Shah : “पवार साहेब महाराष्ट्राला हिशोब द्या, तुम्ही सहकार क्षेत्रासाठी काय केले”, अमित शाह यांचा थेट सवाल
Sharad Pawar on Uddhav and devendra fadnavis
उद्धव ठाकरेंची शाहांवर टीका, फडणवीसांबाबत अवाक्षर नाही, नव्या मैत्रीचे संकेत? शरद पवार म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत भाजप व अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले “ते बिनडोक राजकारणी आहेत. जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही खरंतर एखाद्या नेत्यांने आत्मपरीक्षण केले असते. त्यांचे नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही. खासदार आमदारांशी त्यांचा कुठलाही संपर्क नव्हता. त्यांचे लोक सोडून गेल्यावर भाजपला दोष देण्यापेक्षा, अमित शाह यांच्यावर टीका करण्यापेक्षा, त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे”

२०१९ मध्ये ते भाजप सोबत निवडून आले. त्यांनी भाजपशी गद्दारी केली, तसे झाले नसते तर या महाराष्ट्राचे वेगळा चित्र असते, असे बावनकुळे म्हणाले. २०१४ मध्ये भाजपने प्रथम शिवसेनेशी युती तोडली होती, याची आठवण ठाकरे यांनी करून दिली होती हे येथे उल्लेखनीय.

आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

दावोसमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद होती. त्या ठिकाणी उद्योगपती येतात, गुंतवणूक करार केले जातात. मग ते देशातील करार राहो की विदेशातील. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील आरोप बालिश आहेत, त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाही दोन वर्ष पर्यटन मंत्री होते, ते पर्यटन करत राहिले सरकारमध्ये मूळ गाभा कळला नाही, असे बावनकुळे म्हणाले.

विदर्भ गुंतवणूक

हा महाराष्ट्र थांबणार नाही, विकसित महाराष्ट्र होणार आहे, एकनाथ शिंदे सरकार आणि आता फडणवीस सरकार जसे चालेल तसे विदर्भ, गडचिरोलीपासून बुलढाणापर्यंत असलेलं सर्व मागासलेपण दूर होणार आहे

Story img Loader